त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात दोन तरुणींनी एकत्र राहण्यासाठी लिव्ह इन करार केला आहे. एकमेंकींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणींच्या एकत्र राहण्याला कुटुंबातून विरोध होता. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.They both say we will live together, live-in agreement of lesbian in Pune

यातील एक तरुणी नागपूरची तर दुसरी गोंदियाची आहे. नातेवाइकांच्या लग्न सोहळ्यात दोघी प्रेमात पडल्या. यावर कुटुंबाने विरोध केला. एकीला जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात या समलिंगी तरुणींनी स्वेच्छेने लिव्ह इनमध्ये राहण्यासंबंधी कायदेशीर करार केला. जोपर्यंत दोघींपैकी एक कुणीतरी हा करार रद्द करत नाही तोवर पोलीस, कुटुंब आणि जवळचे नातेवाईकही त्यांच्या संबंधांना आडकाठी करू शकणार नाहीत.


समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून समलिंगी जोडप्यांना दिलासा दिला आहे. यातील एक तरुणी म्हणाली, माझ्य मैत्रिणीच्या कुटुंबाचा आमच्या नात्याला विरोध होता. कमी वयातच तिचे लग्न करायचे ठरवले होते. तेव्हा कुणाशी लग्न करायचे नाही.

मला तुमच्यासोबत राहायचेय असे ती म्हणाली आणि घरातून पळून आली. आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने तिची हरवल्याची तक्रार केली. माझ्यावर गुन्हाही दाखल झाला होता. पोलीस तिच्या कुटुंबाच्या बाजूने होते. तिला कुटुंबासमवेत जाण्यासाठी जबरदस्ती करीत होते.

आम्ही राईट टू लव्ह संस्थेसाठी काम करणाऱ्या अभिजित कांबळे यांच्या माध्यमातून विकास शिंदे यांना भेटलो. त्यांच्यामार्फत आम्ही कायदेशीरपणे लिव्ह इनमध्ये राहण्याचा करार केला आहे. आम्ही समाजाचा किंवा पुढे काय होणार याचा विचार केलेला नाही.

They both say we will live together, live-in agreement of lesbian in Pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण