फिनलँडचे शाळेचा अभ्यासक्रम पुण्यात शिकता येणार


फिनलँड देशातील शैक्षणिक अभ्यासक्रम पुण्यातील गाेयंका ग्लाेबल एज्युकेशन येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल मार्फेत सुरु हाेणार आहे. एज्युक्लस्टर फिनलँडच्या सहकार्याने देशात प्रथमच फिन्निश हा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. Finland education now study in pune there is collaboration of Finland international school and goyanka global education


विशेष प्रतिनिधी

पुणे : जगातील सर्वात आनंददायी देश समजल्या जाणाऱ्या फिनलँड देशातील शैक्षणिक अभ्यासक्रम पुण्यातील गाेयंका ग्लाेबल एज्युकेशन येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल मार्फेत सुरु हाेणार आहे. एज्युक्लस्टर फिनलँडच्या सहकार्याने देशात प्रथमच फिन्निश हा अभ्यासक्रम सुरु केला जात असल्याची माहिती स्कूलचे संचालक शशांका गाेयंका आणि प्राचार्या मिन्ना रेपाे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गाेयंका म्हणाले, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाकरिता फिन्निश अभ्यासक्रम मुलांना त्यांची खरी आवड शाेधण्यात, त्यांचा उद्देश शाेधण्यात व त्यांचे स्वत:चे भविष्य घडविण्यात मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना फिनलँड बाेर्ड व आयबीकडून दुहेरी मॅट्रिकचे प्रमापत्र प्राप्त हाेईल तसेच प्राध्यपांकबाबत चार पैकी तीन फिनलॅंड मधून येणार आहे. सुुरुवातीला सिनिअर केजी ते चाैथी इयत्ता पर्यंत ही शाळा सुरु करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण २०२० चा अंर्तभाव ही फिन्निश अभ्यासक्रमा साेबत करण्यात येणार आहे.

Finland education now study in pune there is collaboration of Finland international school and goyanka global education

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण