ST Strike : आझाद मैदानानंतर एसटी कर्मचाऱ्यांना सीएसएमटी स्टेशनवरूनही हुसकावले; आंदोलकांना अश्रू अनावर!!; 5 कर्मचारी गायब!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पर फेक झाल्यानंतर पोलिस खवळले असून त्यांनी कठोर भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री पोलिसी बळाचा वापर करून आझाद मैदानावरून बाहेर काढले आणि त्यानंतर ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून देखील हुसकावून लावले आहे.After Azad Maidan, ST personnel were also chased away from CSMT station

शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून मध्यरात्री बाहेर काढले. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवून सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आले.



पण त्यानंतर आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरूनही हुसकावण्यात आले आहे. तिकीट असेल तरच प्लॅटफॉर्मवर बसा अशा सूचना आंदोलकांना देण्यात आल्या. आंदोलकांची तिकीट तपासणी करून नंतर त्यांना बाहेर काढले. काल आझाद मैदानातून हुसकावल्यानंतर आंदोलक सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या मांडून बसले होते, पण आता पोलीस त्यांना यलो गेट पोलीस स्थानकात घेऊन जात आहेत.

5 कर्मचारी कुठे गेले?

दरम्यान, आझाद मैदानातून मध्यरात्री पोलिसांनी 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आता त्यांची कुठलीच माहिती मिळत नाही. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचा आरोप एका आंदोलक महिलेने केला आहे. यावेळी आंदोलकांना अश्रू अनावर झाले होते. आमचे सहकारी कुठे गेले, त्यांना कुठे नेण्यात आले?, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले आहेत.

After Azad Maidan, ST personnel were also chased away from CSMT station

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात