महत्त्वाची बातमी : ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आयटीआर


जास्तीत जास्त करदात्यांनी इनकम टॅक्स रिटन दाखल करावा यासाठी आता आयकर विभागाकडून देखील पुढाकार घेण्यात आला आहे. Important News: ITR can be filed till 31st December


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तुम्ही इनकम टॅक्स रिटन (ITR) भरण्याबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.३१ डिसेंबरपर्यंत तुम्हाला इनकम टॅक्स भरता येऊ शकतो.तसेच अर्थ मंत्रालयाच्या वतीने इनकम टॅक्स भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पहाता आजच आपला टॅक्स भरा, आणि गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान जास्तीत जास्त करदात्यांनी इनकम टॅक्स रिटन दाखल करावा यासाठी आता आयकर विभागाकडून देखील पुढाकार घेण्यात आला आहे.



अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दररोज चार लाखांपेक्षा अधिक दाते हे आपला इनकम टॅक्स भरत आहेत. तसेच २०२०-२१ च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आपले इनकम टॅक्स रिटन दाखल केला आहे.करदात्यांच्या मोबाईलवर एसएमस पाठवणे, टीव्ही, वृत्तपत्रे अशा माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करणे, त्यातून कर भरण्याचे आवाहन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश करून आयकर विभागाकडून करदात्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Important News : ITR can be filed till 31st December

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात