सोलापूर : “लाेकशाही टिकवण्यासाठी दिनदलितांनी पुढाकार घेत ,भावना मनात ठेवून कामाला लागले पाहिजे” ; आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना


महापरिनिर्वाण दिन २०२१ निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापुरातील पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली आहे. Solapur: In order to maintain democracy, the Dalits should take initiative and work with their emotions in mind; Emotions expressed by MLA Praniti Shinde


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत .तसेच काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिन २०२१ निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापुरातील पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की , बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले त्याचा अपमान हाेताना दिसत आहे. त्या लाेकशाहीचा अपमान हाेताना दिसत आहे. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. लाेकशाही आणि संविधान जपले पाहिजे.



पुढे शिंदे म्हणाल्या की , आपलं काम केवळ जयंती अथवा महापरिनिर्वाण दिन या पुरत मर्यादित न ठेवता सातत्याने झाले पाहिजे.तसेच आता त्या क्रांतीची गरज आहे आणि ही क्रांती आता गाेरगरीब यांच्या माध्यमातून हाेऊ शकते. ना काेणत्याही राज्यकर्त्यांकडून ना कोणत्या पक्षाकडून आता अपेक्षा राहिलेली नाही. आणि ती ताकद या लाेकशाहीतच आहे. अशी भावना काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी साेलापूर येथे व्यक्त केली.

बाबासाहेब यांच्या विचारांना आम्ही वंदन करताे. लाेकशाही टिकवण्यासाठी दिनदलितांनी पुढाकर घेत आणि भावना मनात ठेवून कामाला लागले पाहिजे. त्यामुळे ख-या अर्थाने ही हुकुमशाही संपेल आणि लाेकशाही अबाधित राहील असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

Solapur : In order to maintain democracy, the Dalits should take initiative and work with their emotions in mind; Emotions expressed by MLA Praniti Shinde

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात