प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्य राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी बारा खासदारांचे निलंबन केले आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या निलंबित खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीच्या निवेदक पदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवला आहे. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरुर यांनी देखील संसद टीव्हीचा निवेदक पदाचा राजीनामा दिला आहे.After priyanka chaturvedi shashi tharoor resign from sansad TV


सावरकर कोण होते?; शशी थरूर, राजदीप यांना चरित्रकार विक्रम संपत यांनी दिले चोख प्रत्युत्तर


प्रियंका चतुर्वेदी आणि शशी थरूर हे दोघेही संसद टीव्ही मधील दोन कार्यक्रमांचे निवेदक होते. प्रियंका चतुर्वेदी या “मेरी कहानी” या कार्यक्रमाच्या होस्ट होत्या, तर शशी थरूर हे टू द पॉईंट या कार्यक्रमाचे होस्ट होते. राज्यसभेतील या बारा खासदार यांचे निलंबन जोपर्यंत मागे घेणार नाही तो पर्यंत हे दोन कार्यक्रम हे दोन्ही नेते होस्ट करणार नाहीत.

बारा खासदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने विरोधात खासदारांनी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद टीव्हीचा राजीनामा देण्याचा नवा पायंडा पाडला आहे.

After priyanka chaturvedi shashi tharoor resign from sansad TV

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात