उत्तर प्रदेशातील प्रमुख मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक असलेले वसीम रिझवी इस्लाम धर्म सोडून आजपासून हिंदू झाले आहेत. गाझियाबादमध्ये यती नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्मात प्रवेश दिला. वसीम रिझवी म्हणाले की, मला इस्लाममधून बाहेर फेकण्यात आले आहे, दर शुक्रवारी आमच्या डोक्यावर इनाम वाढवले जाते, आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे. Wasim Rizvi left Islam to become a Hindu from today, Dasna’s Yeti Narasimhanand joined Sanatan Dharma
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रमुख मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक असलेले वसीम रिझवी इस्लाम धर्म सोडून आजपासून हिंदू झाले आहेत. गाझियाबादमध्ये यती नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्मात प्रवेश दिला. वसीम रिझवी म्हणाले की, मला इस्लाममधून बाहेर फेकण्यात आले आहे, दर शुक्रवारी आमच्या डोक्यावर इनाम वाढवले जाते, आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे.
वसीम रिझवी यांनी यापूर्वीच सोमवारी इस्लाम सोडून सनातन धर्मात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी यती नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत, वसीम रिझवी त्यागी बिरादरीमध्ये सामील होणार आहेत.
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारणार असल्याची घोषणा केली होती. डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती आपल्याला सनातन धर्मात सामावून घेतील, असे ते म्हणाले होते.
नुकतेच वसीम रिझवी यांनी आपले मृत्युपत्र सार्वजनिक केले होते. त्यात त्यांनी मृत्यूनंतर त्यांचे दफन करू नये, तर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार करून त्यांचे पार्थिव जाळण्यात यावे, अशी घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी त्यांच्या चितेला अग्नी द्यावा, असे वसीम रिझवी म्हणाले होते. वसीम रिझवी म्हणाले होते की, काही लोकांना त्यांना मारायचे आहेत आणि या लोकांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह कोणत्याही कब्रस्तानात दफन करू देणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाचे स्मशानभूमीत दहन करावे.
इस्लाममध्ये सुधारणांची मागणी करणारे वसीम रिझवी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत. त्यामुळेच त्यांना अनेकदा धमक्याही आल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कुराणातील २६ आयती काढून टाकण्याची मागणी केली होती. यावर कोर्टात सुनावणी झाली पण त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली. तेव्हापासून वसीम रिझवी मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App