एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये वसीम रिझवी यांच्याविरोधात केली तक्रार दाखल


वसीम रिझवी यांनी ‘ मोहम्मद ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता.दरम्यान वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं.AIMIM chairman Asaduddin Owaisi files complaint against Wasim Rizvi in ​​Hyderabad


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :वसीम रिझवी यांच्या वक्तव्यामुळे तसेच त्यांच्या लिखाणामुळे अनेकवेळा धार्मिक तेढ निर्माण झालेला पाहायला मिळतो.वसीम रिझवी यांनी ‘ मोहम्मद ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता.दरम्यान वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं. अनेक मौलानांनी वसीम रिझवी यांना मुस्लिम धर्मातून बेदखल करत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आपण खरे मुस्लिम आहोत, असं वसीम रिझवी वारंवार सांगतात.

काल (17 ) नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली होती.यावेळी त्यांनी येथील पोलीस आयुक्तांची भेट घेऊन रिझवी यांच्यावर आरोप करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.



यावेळी ओवेसी म्हणाले की , आम्हाला आशा आहे की रिझवी यांना लवकरच अटक केली जाईल.पुढे रिझवी यांच्यावर त्यांच्या ‘मुहम्मद’ या पुस्तकात पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्याचा आरोप आहे.

तसेच एआयएमआयएमने ट्विटरवर म्हटले आहे की, रिझवीची पुस्तके आणि भाषणे मुस्लिमांविरुद्ध तेढ निर्माण करत आहेत,यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यांनी रिझवी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम १३५A, १५३B, २९५A, ५०४ आणि ५०५ (१) (c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रिझवी यांच्या ‘मोहम्मद’ या पुस्तकावरील वाद

वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील डासना येथील महाकाली मंदिराला भेट दिल्यानंतर महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या ‘मोहम्मद’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन केले होते.या पुस्तकात त्यांनी ‘इस्लाम जगात का आला आणि त्यात इतके दहशतवादी विचार का आहेत?’याचा दावा आहे. याशिवाय या पुस्तकातून पैगंबर मुहम्मद यांचे चरित्रही समोर येत असल्याचा रिझवी यांचा दावा आहे.

AIMIM chairman Asaduddin Owaisi files complaint against Wasim Rizvi in ​​Hyderabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात