हर्बल हुक्क्या सुरु करण्यास दिल्लीतील बार, रेस्टॉरंट मालकांना परवानगी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या रोजीरोटीवर गदा आणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान मांडले. Herbal hukka opend in Delhi

न्यायालयाने आज बार आणि रेस्टॉरंट चालकांना हा दिलासा देतानाच त्यांना कोरोना नियमांचे मात्र सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले. आता याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये असे सांगतानाच न्यायालयाने संसर्गाची परिस्थिती बदलल्यास मात्र सरकार न्यायालयामध्ये दाद मागू शकते असे म्हटले आहे.



विविध रेस्टॉरंट आणि बारच्या मालकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेताना न्या रेखा पल्ली यांनी हे निर्देश दिले. केवळ कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत हे नियम कायमस्वरूपी चालू ठेवता येणार नाहीत. प्रशासनाने याआधीच सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि कार्यक्रमासाठीच्या सभागृहांना परवानगी दिली असल्याचे न्या.पल्ली यांनी स्पष्ट केले.

Herbal hukka opend in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात