शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा


संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत विरोधकांनी तीन कृषी कायद्यांसह पेगॅसस प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं होतं. यावेळी प्रचंड गदारोळ सभागृहात झाला होता. यानंतर १२ जणांना निलंबित करण्यात आले .राज्यसभेतील निलंबनानंतर ‘मेरी कहानी’ कार्यक्रमाच्या अँकर असलेल्या चतुर्वेदी यांचा निर्णयShiv Sena MP Priyanka Chaturvedi releases ‘Parliament TV’ show ‘Meri Kahani’; Tadkafadki resigns after suspension in Rajya Sabha


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘अशोभनीय वर्तन’ केल्याबद्दल १२ जणांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले .यानंतर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीचा राजीनामा दिला आहे. वास्तविक प्रियंका चतुर्वेदी संसद टीव्हीवरील कार्यक्रमात अँकरची जबाबदारी सांभाळत होत्या. प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून शोच्या अँकर पदाचा राजीनामा देण्याचे कारण दिले आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी बेजबाबदार वर्तन केल्या बद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह १२ खासदारांना अधिवेशन काळासाठी निलंबित केलं.



हे खासदार सध्या संसदेच्या परिसरात आंदोलन करत आहेत. निलंबनाचा निर्णय एकतर्फी घेतल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदींकडून केला जात असून, आज त्यांनी ‘संसद टीव्ही’वरील ‘मेरी कहानी’ कार्यक्रमाच्या अँकर पदाचाही राजीनामा दिला आहे.

‘दुःखद अंतःकरणाने मी ‘संसद टीव्ही’वरील ‘मेरी कहाणी’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या जबाबदारीतून बाजूला होत आहे. अशा पदावर राहू इच्छित नाही, जिथे माझी प्राथमिक अधिकारच हिरावून घेतले जात आहेत.

हे सगळं 12 खासदारांच्या मनमानी निलंबनामुळे झालं असून, जितकी मी या कार्यक्रमाशी जोडली गेले होते, तितकीच दूर जात आहे’, चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.’राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदारांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

मागील अधिवेशनातील वर्तणुकीमुळे १२ खासदारांचंही निलंबनही मी विसरु शकत नाही. संसदेच्या यापूर्वी असं कधीच घडलेलं नाही, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.

Shiv Sena MP Priyanka Chaturvedi releases ‘Parliament TV’ show ‘Meri Kahani’; Tadkafadki resigns after suspension in Rajya Sabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात