५०,००० नोकऱ्या कुठे? केंद्रशासित प्रदेशाकडे तुम्ही फक्त पर्यटनाच्या दृष्टीनेच पाहणार का? जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच त्याग करू ; नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला

विशेष प्रतिनिधी

जम्मू : 11 महिने आंदोलन केल्यानंतर, 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच पार्श्वभुमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणतात, कलम 370, 35-अ परत मिळवण्याचे वचम दिले आहे आणि आता त्यासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यासाठी तयार आहोत.

where are 50,000 jobs promised? Will you look at the Union Territory only in terms of tourism? We will sacrifice like the farmers to get back the special status of Jammu and Kashmir; National Conference President Farooq Abdullah

पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त एनसीच्या युवा शाखेच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी पक्ष हिंसेला अजिबात पाठिंबा देत नाही आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच त्याग करून आम्ही तो परत मिळवू असे त्यांनी एनडीटीव्ही सोबत सांगितले आहे.

पुढे ते म्हणतात, 370, 35-अ हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन वाढले आहे. पण एका केंद्रशासित प्रदेशाकडे तुम्ही फक्त पर्यटनाच्या दृष्टीनेच पाहणार आहात का? असा प्रश्न त्यांनी अमित शहा यांना विचारला आहे.


फारुख अब्दुल्ला यांचे तालिबानवरचे प्रेम पुन्हा उफाळले; केंद्र सरकारला दिला चर्चेचा सल्ला


त्याचवेळी त्यांनी अमित शहा यांना आठवण करून दिली की, तुम्ही 50000 नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते ल. त्या नोकऱ्या कुठे आहेत? उलट तुम्ही आमच्या लोकांचे हक्क हिसकावून घेत आहात. पंजाब आणि हरयाणातील लोक जम्मू आणि काश्मीरमधील बँकमध्ये नोकरी करण्यासाठी येत आहेत. जम्मू काश्मीरच्या लोकांना येथील बँकांमध्ये नोकरी का दिली जात नाही? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

where are 50,000 jobs promised? Will you look at the Union Territory only in terms of tourism? We will sacrifice like the farmers to get back the special status of Jammu and Kashmir; National Conference President Farooq Abdullah

 

महत्त्वाच्या बातम्या