फारुख अब्दुल्ला यांचे तालिबानवरचे प्रेम पुन्हा उफाळले; केंद्र सरकारला दिला चर्चेचा सल्ला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभर तालिबानी दहशतवादी आणि त्यांच्या हिंसेवर जहरी टीका होत आहे. बंदूक आणि मुडदा यांचे जवळचे नाते असलेल्या तालिबानचा पुळका जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना आला आहे. यांचे तालिबानवरचे प्रेम पुन्हा उफाळून आले आहे. केंद्र सरकारने तालिबानशी मधुर संबध निर्माण करावेत आणि चर्चा करावी, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. Farooq Abdullah’s love for the Taliban resurfaced; Discussion advice given to the central government

अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने विविध प्रकल्पात कोट्यवधी रुपये ओतले आहेत. त्यामुळे भारताने आता अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीशी मधुर संबध ठेवले पाहिजेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असा सल्ला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिला आहे.



 

 

अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने मोठी मदत केली. कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यामुळे तालिबानशी संबध ठेवण्यात गैर काय ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

अफगाणिस्तानात यापूर्वी हमीद कारझाई आणि अब्दुल घनी यांचे सरकार असताना भारताने अफगाणिस्तानच्या विविध प्रकल्पात कोट्यवधी खर्च केले आहेत. आता तालिबानी राजवट आल्याने त्यांच्याशी चर्चा करावी, असे मत अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.

Farooq Abdullah’s love for the Taliban resurfaced; Discussion advice given to the central government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात