खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम


विशेष प्रतिनिधी

खामगाव : बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. त्याला एक वाघ कारणीभूत ठरला आहे. Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest Department search operation in urban areas

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. रायगड कॉलनी भागातील नाल्यात हा वाघ लपून बसल्याचे वृत्त आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचा शोध सुरु केला आहे. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

वाघ असलेल्या भागांत कलम १४४  लागू केले आहे. तसेच,मुक्त संचार करण्यासही बंदी घातली आहे. रात्री उशिरापर्यंत वाघाचं सर्च ऑपरेशन राबविले आहे. पण, अंधारामुळे ऑपरेशन थांबविण्यात आलं. वन विभागाने १० नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.



सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. आधी कोरोना आणि आता चक्क वाघामुळं लावलेल्या जमावबंदीमुळं नागरिकही त्रस्त झाले आहेत.

Operation Tiger in Khamgaon; Curfew, imposed, Forest Department search operation in urban areas

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात