घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस देखील अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत. Bhiwandi: A fire broke out at a factory in Gautam compound area; Two fire trucks arrived at the spot
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून आगीच सत्र सुरू आहेत.भिवंडी शहरातील गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे.संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.
कारखान्यातील केमिकल भरलेल्या ड्रमचे स्फोट होत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस देखील अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत.
दरम्यान केमिकल ड्रम्सचे स्फोट होत असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण निर्माण होत आहेत. तरी देखील अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर खूप दाटीवाटीचा आहे.लवकरच या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App