मुंबईत पहिल्या पावसाची दाणादाण ; लोकल, बेस्ट ठप्प, पावसाळी कामाचा उडाला बोजवारा


वृत्तसंस्था

मुंबई : पहिल्याच पावसात लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडली.त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. हे चित्र राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आहे. जागोजागी पाणी साठत आहे. मग, महानगरपालिकेने नेमकी कोणती पावसाळी कामे केली ? असाच प्रश्न जनतेला पडतो आहे. First rains in Mumbai; Local, Best Jam, What about Rainy work ? मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सूनने मुंबईसह महामुंबई परिसराला जोरदार दणका दिला.



अनेकांच्या घरात शिरले पाणी; वाहतूकही मंदावली

ठाणे जिल्ह्यात पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांमध्ये पाणी तुंबले, तसेच गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने दिवा, मुंब्रा, कल्याण पूर्व, भिवंडी शहरातील अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. वीजपुरवठाही खंडित झाला होता. भिवंडी-मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक मंदगतीने सुरू आहे. दरम्यान, मुंबईतील परिस्थितीचा आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दुपारी भेट दिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासह विविध कार्यवाहीबाबत त्यांनी निर्देश दिले.

First rains in Mumbai; Local, Best Jam, What about Rainy work ?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात