लसीकरणाच्या जोरावर इस्राईल बनला जगातील पहिला कोविडमुक्त देश


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : इस्राईलने हर्ड इम्युनिटी मिळवल्यानंतर देशातील बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे देशात मास्क घालण्याचे बंधन काढून घेण्यात आले. तसेच जगातील पहिला कोविडमुक्त देश म्हणून इस्राईलने घोषणा केली आहे. Israyel became covid free country

दुसरीकडे इस्राईलमध्ये १२ ते १५ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. इस्राईलमध्ये लसीकरण मोहीम २० डिसेंबर २०२० पासून सुरू झाली होती आणि ती वेगाने राबवली गेली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि ६५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर लसीकरणासाठी वयाचे बंधन कमी करण्यात आले. देशातील जवळपास ७० टक्के नागरिकांचे लसीकरण आतापर्यत झाले आहे.आरोग्य मंत्री ॲडलस्टीन यांनी म्हटले की, देशात संसर्ग पसरला नाही तर निर्बंध संपूर्णपणे मागे घेतले जाईल. तत्पूर्वी गर्दीवर बंदी आणि सामाजिक अंतर राखण्याविषयीचे नियम एक जूनपासूनच मागे घेण्यात आले आहेत. अर्थात परदेश प्रवासासंदर्भात बंधने कायम ठेवली आहेत. सध्या नऊ देशाच्या प्रवासावरची बंदी आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइनचे नियम लागू असून कोरोना चाचणी देखील आवश्यरक आहे.

Israyel became covid free country

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय