हिमालयाच्या बर्पाच्छादित पर्वतरांगात मानवाचे पाच हजार वर्षांपासून वास्तव्य


विशेष प्रतिनिधी

मेलबोर्न : पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची डेटिंगची आधुनिक पद्धत वापरून ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मनुष्याने तिबेटच्या पठाराच्या या दुर्गम भागात पाच हजारांहून अधिक वर्षे वास्तव्य केल्याचा दावा केला आहे. संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. Man lives in Himalaya since 5000 years

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील संशोधक जॅन-हेंड्रीक मे आणि वूलनगोंग विद्यापीठातील संशोधक ल्युक ग्लिगॅनिक यांच्या गटाने हे संशोधन केले. मध्य-दक्षिण तिबेटमध्ये पाच हजारांहून अधिक वर्षे मानवी अस्तित्वाचा हा पहिला पुरावा असल्याचा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांनी पुरातत्वशास्त्रातील ‘ओएसएल डेटिंग’ ही नवी पद्धत वापरली. वाळूच्या दाण्यातील स्फटिक किंवा क्रिस्टलच्या रचनेमधील ऊर्जेवर हे तंत्र आधारित आहे. वाळू सूर्यप्रकाशापासून दूर असल्यावर तसेच पुरली गेल्यावर आसपासचे खडक व गाळाच्या कमी विकिरणामुळे त्यातील स्फटिकातील ऊर्जा साठविली जाते. ती प्रयोगशाळेत निळ्या किंवा हिरव्या प्रकाशाच्या मदतीने मोजली जाते.



ऑस्ट्रियातील ‘ओएसएल’ प्रयोगशाळेत संशोधकांनी यासंदर्भात अनेक वर्षे संशोधन केले. त्याचप्रमाणे, संशोधकांनी खडकाच्या पृष्ठभागाशी संबंधित डेटिंग पद्धतीवर अधिक भर दिला. त्यानुसार, तिबेटच्या पठारावरील सु-रे या पुरातत्व ठिकाणावरील मानवनिर्मित दगडांची हत्यारे किंवा शिल्पे ५,२०० ते ५,५०० वर्षांपूर्वीची असल्याचे आढळले.

मनुष्याने वस्ती केलेल्या पृथ्वीवरील शेवटच्या प्रदेशामध्ये तिबेटच्या या पठाराचा समावेश होतो. हिमालयानजीक आठ कि.मी. हून अधिक उंचीच्या पर्वतरांगांमुळे हा प्रदेश मानवी वस्तीसाठी अतिशय प्रतिकूल आहे. त्यामुळे, या प्रदेशात मनुष्याने कुठे आणि केव्हा वस्तीस सुरुवात केली, हा पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये वादाचा मुद्दा होता.

Man lives in Himalaya since 5000 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात