महाराष्ट्र सरकारचे कोरोना व्यवस्थापन!, बऱ्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांना कळविले


 महाराष्ट्रात कोरोनाविरुध्द उपाययोजनेसाठी सक्षम यंत्रणा तयार केल्याचा दावा केला जात  आहे. मृत्यू रोखल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, संपूर्ण यंत्रणाच किती बेभरवशाची आहे याचा पुरावा पुढे आला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे कोरोनावर उपचार घेऊन एक युवक बरा झाल्यावरही त्याच्या घरी त्याचा मृत्यू झाल्याचे फोनवरून कळविण्यात आले.Maharashtra government’s corona management !, informed the family that the recovered youth died


प्रतिनिधी

सातारा : महाराष्ट्रात कोरोनाविरुध्द उपाययोजनेसाठी सक्षम यंत्रणा तयार केल्याचा दावा केला जात  आहे. मृत्यू रोखल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, संपूर्ण यंत्रणाच किती बेभरवशाची आहे याचा पुरावा पुढे आला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे कोरोनावर उपचार घेऊन एक युवक बरा झाल्यावरही त्याच्या घरी त्याचा मृत्यू झाल्याचे फोनवरून कळविण्यात आले. फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय 20) असे या युवकाचे नाव आहे.गेल्या महिन्यात त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे. सोमवारी  7 जून सिद्धांत घरीच असताना त्याचा मोबाईल खणखणला. फोन त्यानेच घेतला. पलिकडील महिलेने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली.

हे ऐकून सिद्धांतला काही सुचेना. त्याने ‘हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र निरोप देत आहेत,

असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले.  जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्धांतच्या आईने केली आहे.

Maharashtra government’s corona management !, informed the family that the recovered youth died

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय