पर्यावरण बदलाचा वन्यप्राण्यांच्या जननक्षमतेवरही होतोंय परिणाम


सध्या मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही मोठा परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास, उष्णता सहन न झाल्याने प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. Climate change is also having an impact on wildlife fertility

मात्र, अशा प्रकारच्या तापमानात काही प्रजातींमधील नरांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे संशोधनातून दिसून आल्याचे मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. त्यामुळे प्रजातींचे अस्तित्व हे ते कोणत्या तापमानात टिकून राहतात यापेक्षा कोणत्या वातावरणात ते पुनरुत्पादन करू शकतात, यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून प्रजाती नष्ट होण्यामागे तापमान हे एक कारण असू शकते. तसेच, पर्यावरण बदलाचा प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांबाबतही अधिक अभ्यास आवश्य.क असल्याचे यामुळे दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
तापमानवाढीमुळे काही किटकांमधील आणि मधमाश्यांेच्या काही प्रजातीमधील जननक्षमता नष्ट झाल्याची उदाहरणेही संशोधकांनी दिली. तसेच, गोवंशीय जनावरे, डुक्कर, मासे आणि पक्ष्यांमध्येही तापमानवाढीमुळे जननक्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या तापमानवाढीचा जैववैविध्यावर कसा परिणाम होतो, यावर संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे.

घरमाश्यांतच्या ४३ प्रजातींवर अभ्यास करून ब्रिटन, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या प्रजातींमधील नर माश्यां ना वेगवेगळ्या तापमानाखाली चार तास ठेवण्यात आले. अधिक तापमानात जननक्षमता कमी होत असल्याचे यावेळी आढळून आले. अधिक तापमानामुळे ४३ पैकी ११ प्रजातींची ८० टक्के जननक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. या अभ्यासाचा आधार घेऊन या मुद्द्यावर अधिक प्रमाणात संशोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Climate change is also having an impact on wildlife fertility

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण