राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला अवघा ब्रिटन करणार सलाम

वृत्तसंस्था

लंडन : पुढील वर्षी जून २०२२ मध्ये ब्रिटनची ९५ वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय कारकीर्दीची ७० वर्षे पूर्ण करत आहे. एवढी प्रदीर्घ कारकीर्द अनुभवणारी पहिली ब्रिटिश सत्ताधीश ठरण्याचा मानही राणीने मिळविला आहे. या ऐतिहासिक घटनेनिमित्त ब्रिटनमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातून राणीच्या कारकीर्दीचा ७० वर्षांच्या प्रवास मांडला जाईल. Briton celebrates Queens era

वडिल किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणीच्या कारकीर्दीस सुरवात झाली. पुढील वर्षी २ ते ५ जून या वीकेंडदरम्यान वर्धापनदिन सोहळा परमोच्च शिखर गाठेल. दोन जूनला विशेष संचलनाने त्याची सुरवात होईल.राणीचा वाढदिवस सामान्यत: जूनमधील दुसऱ्या रविवारी असतो. पारंपरिक संचलनात १,४०० जवान, २०० घोडे आणि ४०० संगीतकार सहभाग घेतील. बकिंघम पॅलेसपासून संचलनाला सुरवात होईल. या दिमाखदार संचलनात शाही राजघराण्याचे सदस्यही सहभागी होतील. त्यानंतर शाही हवाई दलाच्या कसरती पार पडतील. शाही घराण्याचे सदस्य बकिंघम पॅलेसच्या बाल्कनीतून या कसरती पाहतील.

या काळात बॅंकांना सुटी जाहीर केली असून, लोकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बकिंघम पॅलेसच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ब्रिटनसह चॅनेल आयलंड, आयसल ऑफ मॅन आणि युके ओव्हरसीज टेरिटरीज या प्रदेशामध्ये दीपस्तंभ प्रजल्वित केले जातील. एवढेच नव्हे, तर नवी दिल्लीसह राष्ट्रकुल देशांच्या राजधानीतही प्रथमच दीपस्तंभ प्रजल्वित केले जाणार आहेत.

Briton celebrates Queens era

महत्त्वाच्या बातम्या