धर्म वगैरे काही नाही ! मुस्लिम समाज दोन्ही वेळा मांसाहार करतो म्हणून त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण कमी ; हिंदुत्ववादी शिवसेना आमदाराने वारकरी संप्रदायातील महाराजांना सुनावले


शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली. त्यात त्यांनी देव वगैरे कुणी येणार नाही दररोज अंडी खा मांसाहार करा असा सल्ला दिलाय.


यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे .त्यांना फोन करून याबाबत जाब विचारण्यात येतोय .अशीच एक ऑडियो क्लिप तुफान व्हायरल झाली आहे .बुलढाण्यातील वारकरी संप्रदायातील महाराज यांनी याबाबत जाब विचारला असता आमदार गायकवाड़ यांनी हिंदुत्व-धर्म-आणि वारकरी संप्रदायाबद्दल अपशब्द वापरले.


संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल.


विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मांसाहार करा असे विधान बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायवकाड यांनी केले . संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदयात तीव्र संताप व्यक्त होत आहे .त्यामुळे या संप्रदयातील महाराजांनी आमदार संजय गायकवाड यांना फोनद्वारे जाब विचारला. हिंदुत्व आणि धर्म यावरुन जाब विचारणाऱ्या या महाराजांना आमदार गायकवाड यांनी भलतेच सुनावले अपशब्द देखील वापरले . जेव्हा तुमच्या महाराजांनी मंडपातून बायका पळवल्या तेव्हा संप्रदाय, धर्म धोक्यात आला नव्हता का?असा उलट सवालही आमदार गायकवाड़ यांनी केला आहे. Nothing but religion! As the Muslim community eats meat both times, the death rate among them is less: Pro-Hindu Shiv Sena MLA told Maharaj of Warkari sectसंजय गायकवाड यांनी मांसाहाराचा सल्ला दिल्यानंतर अनेक महाराजांनी त्यांना फोन केले आणि निषेध व्यक्त केला. अशाच एका फोनची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत महाराज आणि आमदार गायकवाड यांचा संवाद ऐकायला मिळत आहे. प्रशांत महाराज यांनी गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी फोन केला. त्यावेळी गायकवाड यांनीच त्यांना उलट जाब विचारला आहे .

काय आहे प्रकरण?

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर अंडे,मटन खा. कोरोना काळात देवही वाचवायला येणार नाही’ असे म्हटले होते. आमदार गायकवाड यांचे हे वक्तव्य वृत्तपत्रातही छापून आले. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्या विधानवर वारकरी संप्रदायातील काही लोक नाराज झाले.

हिंदुत्व आणि धर्मशास्त्रावरुन जाब विचारणाऱ्या महाराजांना बोलताना संजय गायकवाड यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी महाराजांना विचारले की, तुमच्या महाराजांनी मंडपातून बायका पळवून नेल्या, तेव्हा वारकरी सांप्रदायाची बदनामी नाही होत का? मुस्लिम दोन टाईम नॉनव्हेज खातात म्हणून त्यांच्यात मरणाचं प्रमाण कमी आहे, असं मी म्हटलं होतं. धर्म वगैरे काही नाही, जगला तर धर्म आहे. नाहीतर गेला **. कीर्तन करणं एवढंच हिंदुत्व असतं का?चल ठेव फोन असेही ते म्हणाले .आता या अपशब्दांमुळे वारकरी संप्रदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

Nothing but religion! As the Muslim community eats meat both times, the death rate among them is less: Pro-Hindu Shiv Sena MLA told Maharaj of Warkari sect

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण