भारतीय लसींवर शंका घेणारेच आज गुपचूप लस घेत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांकडून विरोधकांची खरडपट्टी

Opponents of Indian vaccines are secretly vaccinating today, NCW president Rekha Sharma said

NCW president Rekha Sharma : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला देशभरात लसीकरण मोहीमही सुरू आहे. तथापि, जेव्हा केंद्राने भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वापराला तातडीची मंजुरी दिली होती, तेव्हा अनेकांनी या लसींवर शंका घेतल्या होत्या. आज जागतिक स्तरावर भारतातील लसींची परिणामकारकता सिद्ध झालेली आहे. लसींवर तेव्हा शंका घेणाऱ्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी खरडपट्टी काढली आहे. Opponents of Indian vaccines are secretly vaccinating today, NCW president Rekha Sharma said


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असताना दुसऱ्या बाजूला देशभरात लसीकरण मोहीमही सुरू आहे. तथापि, जेव्हा केंद्राने भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वापराला तातडीची मंजुरी दिली होती, तेव्हा अनेकांनी या लसींवर शंका घेतल्या होत्या. आज जागतिक स्तरावर भारतातील लसींची परिणामकारकता सिद्ध झालेली आहे. लसींवर तेव्हा शंका घेणाऱ्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी खरडपट्टी काढली आहे.

रेखा शर्मा यांनी याबाबत एकापाठोपाठ अनेक ट्वीट करून लसींचे विरोधक व माध्यमांना सुनावले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, जेव्हा देशाने कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा स्वीकार केला तेव्हा तथाकथित बुद्धवादी, राजकीय नेते म्हणवले जाणाऱ्यांनी माध्यमांमध्ये शंका घ्यायला सुरुवात केली. लसीच्या परिणामकारकतेचा पुरेसा डाटा नाही, तो फेक आहे, आम्ही लस घेणार नाही असेही काही जण म्हणाले होते.

रेखा शर्मा पुढे म्हणाल्या की, याचदरम्यान माध्यमांनीही भारतीय लसींविरोधात जणू मोहीम छेडली होती. शर्मा यांनी भारतीय लसींविरोधात माध्यमांत छापून आलेल्या लेखांची आकडेवारीच दिली आहे. यात इंडियन एक्स्प्रेस -182, लोकसत्ता -172, नवभारत टाइम्स -236, हिंदुस्तान टाइम्स -123, टाइम्स ऑफ इंडिया -28, द वायर -78, द प्रिंट -59, स्क्रोल -122, न्यूजलाँड्री -54, अल्ट न्यूज – 78, द हिंदू – 128 अशी त्यांनी सविस्तर यादी दिली आहे.

यानंतर रेखा शर्मा यांनी लसींविरोधात वक्तव्ये करणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांचीही यादी दिली आहे. त्यांच्या ट्वीटनुसार, काँग्रेसचे 58 नेते, समाजवादी पक्षाचे 17, शिवसेनेचे 27, द्रमुकचे 13, माकपाचे 12, तृणमूलचे 12 नेते लसीविरोधात बोलले. याशिवाय 265 प्रमुख एनजीओंच्या संस्थापक कर्मचाऱ्यांनीही लसीला तेव्हा विरोध केल्याचे म्हटले.
देशातील 172 सेवानिवृत्त आयएएस, आयपीएस, न्यायाधीश आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही लसीविरोधात बोलल्याचे म्हटले आहे. तर यादरम्यान लसीलाविरोध करण्यासाठी तब्बल 342 व्यंगचित्रे प्रकाशित केल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

रेखा शर्मा पुढे लिहितात, मागच्या काही दिवसांपासून काही लसीकरण केंद्रांवर केवळ दोन ते तीन डोस दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याच वेळी मुंबईतील लसीकरणासाठीची मोठी गर्दीही तुम्ही पाहू शकता. येथे 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक शेकडोंच्या संख्येने आल्याचे त्या म्हणाल्या.

राजकीय नेत्यांनी व माध्यमांनी लसीबद्दल पसरवलेल्या भ्रमामुळेच लसीचे लाखो डोस वाया गेले, नव्या ऑर्डरला उशीर झाला आणि उत्पादन क्षमतेत वाढही होऊ शकली नाही. पण आज तेच विरोधक गुपचूप जाऊन लस घेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Opponents of Indian vaccines are secretly vaccinating today, NCW president Rekha Sharma said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात