दीदीगिरी : राज्यपालांनी हिंसापीडितांशी भेटण्यावर ममता बॅनर्जींचा आक्षेप, म्हणाल्या- राज्य सरकारच्या आदेशानंतर करू शकता जिल्हा दौरे

West Bengal CM Mamata Banerjee Opposses Governor Jagdeep Dhankar visits To Violence Affected Districts

Governor Jagdeep Dhankar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपल्या आहेत. सरकारही स्थापन झाले आहे, परंतु राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद अजूनही शमलेला दिसत नाही. राज्यपालांच्या हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांच्या प्रस्तावित भेटीबद्दल मुख्यमंत्री ममतांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल गुरुवारपासून हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत, तेथे अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे, तर कित्येकांनी जिवाला धोका असल्याने आसाममध्ये आश्रय घेतला आहे. West Bengal CM Mamata Banerjee Opposes Governor Jagdeep Dhankar visits To Violence Affected Districts


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुका संपल्या आहेत. सरकारही स्थापन झाले आहे, परंतु राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद अजूनही शमलेला दिसत नाही. राज्यपालांच्या हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांच्या प्रस्तावित भेटीबद्दल मुख्यमंत्री ममतांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल गुरुवारपासून हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत, तेथे अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे, तर कित्येकांनी जिवाला धोका असल्याने आसाममध्ये आश्रय घेतला आहे.

राज्यपालांच्या हिंसेतील पीडित लोकांना भेटण्याच्या घोषणेवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप नोंदविला आहे. राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, राज्यपालांचे सचिव राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्ह्यांचा दौरा निश्चित करू शकतात. राज्यपालांचा दौरा जिल्हा आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरवला जातो. राज्यपाल प्रोटोकॉलच्या विरोधात जात आहेत.

राज्यपालांकडून नियमांचे उल्लंघन, ममतांचा आरोप

ममता बॅनर्जी यांनी आपल्या पूर्वीच्या पत्रांचा उल्लेख करताना म्हटले की, राज्यपालांनी मला आणि राज्य मंत्रिमंडळाची बायपास करून अधिकाऱ्यांशी थेट बोलणे थांबवावे. तुम्ही नियमांचे उल्लंघन करत आहात. त्यांच्याकडून अहवाल मागवत आहात. तुम्ही स्वत: असे वर्तन थांबवावे, असा मी तुम्हाला आग्रह करते. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांनाही निर्देश दिले आहेत.

राज्यपाल 14 मे रोजी आसाममध्ये जाणार

राज्यपाल धनखड 13 मे रोजी बंगालमधील सीतलकुची आणि कूचबिहार या हिंसाचारग्रस्त भागाला भेट देतील. 14 मे रोजी ते आसाममधील रणपागली आणि श्रीरामपूर छावण्यांमध्ये राहणाऱ्या बंगालच्या नागरिकांना भेटतील. याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना राज्यपालांनी स्वत: लिहिले आहे की, ते बीएसएफ हेलिकॉप्टरने हिंसाग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सोशल मीडियावरून माहिती मिळाली की राज्यपाल 13 मे रोजी जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. हे आजवर चालू असलेल्या परंपरेचे उल्लंघन आहे. त्यांना आशा आहे की, राज्यपाल दीर्घकालीन प्रोटोकॉलचे अनुसरण करतील.

निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात 16 ठार

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारात कमीत-कमी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाग्रस्त लोकांना मदत करण्याचीही त्यांनी घोषणा केली होती. राज्यपाल जगदीप धनखड यांनी सोमवारी म्हटले की, ते पश्चिम बंगालमधील हिंसा प्रभावित भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील. ते म्हणाले की, राज्य सरकारला भेटीची व्यवस्था करण्यास सांगितले असूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

West Bengal CM Mamata Banerjee Opposes Governor Jagdeep Dhankar visits To Violence Affected Districts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात