भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, सीरम, भारत बायोटेक वाढविणार लसींचे उत्पादन


देशात कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भारतीयांनासाठी दिलासा देणारी बातमी सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी दिली आहे. सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सुरुवातीपासून दरमहा १० कोटी कोविशिल्ड लसी उत्पादित करणार असल्याचे सांगितले आहे. भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढणार आहे. Good news for Indians, serum, India Biotech will increase vaccine production


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसींची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भारतीयांनासाठी दिलासा देणारी बातमी सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी दिली आहे. सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सुरुवातीपासून दरमहा १० कोटी कोविशिल्ड लसी उत्पादित करणार असल्याचे सांगितले आहे. भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढणार आहे.

भारतातील कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन करणाºया कंपन्यांनी लसींच्या उत्पादनाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला दिला आहे. या अहवालानुसार कोव्हिशिल्डची निर्मिती करणारी सीरम ऑगस्ट महिन्यापासून १० कोटी लस तयार करणार आहे.कोव्हॅक्सिनची निर्मिती करणारी ही कंपनी दरमहा ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे. आरोग्य मंत्रालय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्याउत्पादनाबाबतची माहिती मागितली होती. त्यावर दोन्ही कंपन्यांनी लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत माहिती दिली.

भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्ण मोहन यांनी सरकारला सांगितले की, जुलै महिन्यामध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन ३.३२ कोटी आणि ऑ गस्ट महिन्यात ७.८२ कोटी रुपये होईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये सरकार आणि नियामक बाबतचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितले की, कोविशिल्डचे उत्पादन आॅगस्ट महिन्यात १० कोटी लसींचे उत्पादन होईल आणि सप्टेंबर महिन्यात ते अधिक वाढेल.

Good news for Indians, serum, India Biotech will increase vaccine production

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण