उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक


वृत्तसंस्था

पुणे : उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. In Urli Kanchan Petrol Pump Robbery failed ; 4 Person’s Held

गणेश राजेंद्र शिवडकर (वय २१, रा. आनंदनगर, रामटेकडी), सुनिल प्रकाश गायकवाड (वय २३, रा. रामटेकडी) तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय १९, र. आनंदनगर, रामटेकडी), निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २४, रा. महम्मदवाडी) याना अटक झाली आहे.त्यांचे साथीदार  किशोर प्रकाश गायकवाड (रा. मंगळवार पेठ) आणि आकाश गणपत माने (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, कटर, चाकू, कात्री, कात्रीची पाती, मिरची पुड अशी दरोडा टाकण्याची हत्यारे जप्त केली आहेत.

याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील हवालदार उदय सुदाम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १० मे रोजी रात्री उरुळी कांचन परिसरात गस्त घालत असताना डाळींब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील कॅनॉलच्या कडेला एका कारमध्ये सहाजण संशयास्पदरित्या थांबलेले आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्यावर त्यातील दोघे जण पळून गेले.

पोलिसांनी चौघांना पकडून त्यांच्याकडील हत्यारे जप्त केली आहेत. अधिक चौकशी केली असता महामार्गावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या हेतूने ते चारचाकी मोटारीतून जात होते. त्यांच्याकडील कार चोरीची असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

In Urli Kanchan Petrol Pump Robbery failed ; 4 Person’s Held

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण