पंजाबमध्ये चाललंय काय? आधी रेमडेसिव्हिर नाल्यात फेकले, आता पीएम केअर्समधून मिळालेले व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून

Many Ventilators provided from PM Cares Fund Remains Unused In Punjab, administration Criticized by People

 Ventilators : अवघा देश कोरोना महामारीमुळे संकटात आहेत. ठिकठिकाणी अत्यावश्यक आरोग्य सुविधा, औषधे यांचा तुटवडा आहे. पंजाबमध्ये मात्र ज्यांची चणचण आहे अशाच औषधे व उपकरणांची हेळसांड केली जात आहे. एकीकडे रुग्ण औषधे, व्हेंटिलेटर्सअभावी मरत असताना पंजाबमध्ये मात्र मदत म्हणून मिळालेल्या सुविधांही फेकून दिल्या जात असल्याचे समारे आले आहे. Many Ventilators provided from PM Cares Fund Remains Unused In Punjab, administration Criticized by People


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अवघा देश कोरोना महामारीमुळे संकटात आहेत. ठिकठिकाणी अत्यावश्यक आरोग्य सुविधा, औषधे यांचा तुटवडा आहे. पंजाबमध्ये मात्र ज्यांची चणचण आहे अशाच औषधे व उपकरणांची हेळसांड केली जात आहे. एकीकडे रुग्ण औषधे, व्हेंटिलेटर्सअभावी मरत असताना पंजाबमध्ये मात्र मदत म्हणून मिळालेल्या सुविधांही फेकून दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.

पंजाबमध्ये वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्रातर्फे इतर राज्यांप्रमाणेच येथेही रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी एका नाल्यामध्ये कित्येक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा फेकून दिलेला आढळला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पंजाब सरकारवर टीकेची झोड उठली.

यानंतर आता पंजाबच्या गुरु गोविंदसिंग मेडिकल कॉलेजमध्ये पीएम केअर्स फंडमधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडून असल्याचं निदर्शनास आलं आहे. याबाबत प्रत्येक जण वेगवेगळा दावा करत आहे. ‘द ट्रिब्युन’ नुसार पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स फॉल्टी असल्याचे सांगण्यात आले आहे. तर पंजाब केसरीमधील वृत्तानुसार, पुरेसा प्रशिक्षित स्टाफ नसल्याने हे व्हेंटिलेटर्स रुग्णाच्या एका कोपऱ्यात पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. कारणे काहीही असली तरी अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स पडून राहिल्याने पुन्हा एकदा कॅप्टन अमरिंदर सरकार टीकेचे धनी झाले आहे.

Many Ventilators provided from PM Cares Fund Remains Unused In Punjab, administration Criticized by People

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण