रत्नागिरीत लसीचे झीरो वेस्टेज मिशन ; मात्रा वाचवून जादा डोस देण्याचा प्रयत्न


वृत्तसंस्था

रत्नागिरी : कोरोनाचं लसीकरण करताना काही प्रमाणात डोस वाया जातात. यावर आता रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागानं मिशन झीरो वेस्टेज सुरू केलं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे मिशन सुरू केलं आहे. In Ratnagiri Zero West Mission Of Corona Vaccine

मिशननुसार लसीकरण केंद्रावर दहाजण हजर असल्यास व्हायल फोडली जाणार आहे. त्याप्रकारच्या सूचना जाखड यांनी दिल्या आहेत. यामुळे व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांचं लसीकरण होण्यास मदत होणार आहे.एकदा व्हायल फोडल्यानंतर ती चार तासामध्ये वापरणं बंधनकारक आहे. जिल्ह्यात लस वाया जाण्याचं प्रमाण साधारण 1.9 टक्क्याच्या दरम्यान आहे. एका व्यक्तिला लस देताना सिरिंजमध्ये 0.5 मिली लस भरली जाते.

यावेळी एखादा थेंब वाया देखील जातो. ही बाब लक्षात घेता कोविशिल्ड लसीच्या व्हायलमध्ये दहा टक्के मात्रा अधिक ठेवण्यात आली आहे. पण, आता याच अतिरिक्त मात्रांचा वापर करत जास्तीच्या

लसीकरणासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदेनं मिशन झीरो वेस्टेज हाती घेतलं आहे. त्यामुळे एका व्हायलमधून दहा नाही तर अकरा जणांचं लसीकरण करण्याचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचा मानस आहे.

In Ratnagiri Zero West Mission Of Corona Vaccine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात