‘क्वाड’मध्ये सामील झाल्यास संबंध खराब होतील; चीनची धमकी; पण बांगलादेशने सुनावले, आम्ही अलिप्ततावादी!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला देशाने जाणे याचा अर्थ चीनच्या विरोधात जाणे असा घेतला जाईल, असेही चीनने म्हटले आहे.If you join the quad group, your relations will deteriorate, China threatens Bangladesh


विशेष प्रतिनिधी

ढाका : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली क्वाड गटात सहभागी झालात तर आपले संबंध खराब होतील, अशी धमकी चीनने बांग्लादेशाला दिली आहे. क्वाड हा गट बिजींगविरोधी गट आहे. त्यामध्ये बांग्ला देशाने जाणे याचा अर्थ चीनच्या विरोधात जाणे असा घेतला जाईल, असेही चीनने म्हटले आहे.

चीनचे संरक्षण मंत्री जनरल वे फेंगशे यांनी म्हटले आहे की चीन आणि बांग्लादेशाचे राजनैतिक आणि लष्करी पातळीवर संंबंध आहेत. हे संबंध क्वाडमध्ये बांग्लादेश सहभागी झाल्यास बिघडतील.चीनने क्वाड देशांच्या क्वाड गटाला विरोध केला आहे.चीनचे राजदूत ली साईद यांनी म्हटले आहे की चार देशांच्या क्वाड या क्लबमध्ये सहभागी होणे बांग्ला देशाच्या हिताचे ठरणार नाही. त्यामुळे चीन आणि बांग्लादेशाच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल.

बांग्लादेशचे परराष्टÑ मंत्री डॉ. ए. के. अब्दूल मोमीन म्हणाले, बांग्लादेशाची भूमिका ही कायमच अलिप्तवादाची राहिलीआहे. परराष्टÑ धोरणात समतोल राखताना बांग्लादेश या मूल्यांच्या आधारे पुढील निर्णय घेईल.

If you join the quad group, your relations will deteriorate, China threatens Bangladesh