चीनची मुजोरी ; चीनचा व्हिसा मिळवायचा असेल तर घ्यावी लागणार चीनी लस ; भारतासह इतर 20 देशांवर थोपला नियम


  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप चीनी लस मंजूर केलेली नाही.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनने भारतासह जगातील 20 देशांसाठी नवा नियम लागू केला आहे. हा नियम असा आहे की चीनी व्हिसा घेण्यासाठी त्यांचीच चीनी लस घेणे बंधनकारक आहे. चीनमध्ये व्यवसाय किंवा अभ्यासासाठी गेलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना आता कोरोनाची चीनी लस घेणे बंधनकारक आहे. चीनने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार नवी दिल्लीतील चिनी दूतावासातही ही नोटीस आली आहे. If you want to get a Chinese visa, you have to get a Chinese vaccine; Rules imposed on 20 other countries, including Indiaत्यात म्हटले आहे की, चीनच्या नवीन नियमानुसार भारतासह 20 देशांमधून चीनकडे जाणाऱ्या प्रवाश्यांकडे चिनी लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रवाशांना ही नवीन समस्या उद्भवली आहे. कारण, चीनी लस भारतात उपलब्ध नाही आणि भारतातच यापूर्वी पाच लस मंजूर झाल्या आहेत त्यांचा उपयोग करून मग काय फायदा होणार?

ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इंडोनेशिया, इस्त्राईल, इटली, नायजेरिया, नॉर्वे, पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया येथील लोकांनाही व्हिसा हवा असल्यास चिनी लस घ्यावी लागेल. त्यासंदर्भातच्या नोटिसा संबंधित देशातील चिनी दूतावासात लावल्या आहेत. एका अहवालानुसार या यादीमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. चायनीज लस असलेल्या सर्व व्हिसा अर्जदारांना चीनच्या दूतावासात बोलावले जाईल. मगच पुढील कार्यवाही होईल.

विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप चीनी लस मंजूर केलेली नाही. डब्ल्यूएचओने आतापर्यंत फायझर, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि मॉडर्ना यांच्या लसलाच मान्यता दिली आहे. मग चीनची हीच लस घेण्याची मुजोरी नेमकी कोणत्या शास्त्रीय कारणाने, हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

If you want to get a Chinese visa, you have to get a Chinese vaccine; Rules imposed on 20 other countries, including India

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती