सचिन वाझेला मुंबई पोलीस सेवेतून डच्चू देण्याखेरीज पर्याय होताच कुठे…??, अनिल देशमुख – अनिल परब जोडगोळीच्या राजकीय बळीचा अँगलही महत्त्वाचा


वृत्तसंस्था

मुंबई – अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेला अखेर मुंबई पोलीसांच्या सेवेतून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. मुंबई पोलीसांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. पण अँटिलिया आणि हिरेन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वाझेची पोलीस सेवेतून हकालपट्टी करण्याखेरीज मुंबई पोलीसांपुढे पर्याय होताच कुठे…??, या सवालावर चर्चा सुरू झाली आहे. त्याला अनिल देशमुख – अनिल परब या मंत्र्यांच्या राजकीय बळींचा अँगलही जोडला जात आहे. sachin waze dismissed imminant political decision

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानींचे निवासस्थान अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच महाभारत घडले. गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागेपर्यंत याचे राजकीय धागेदोरे पोहोचले. यामध्ये १०० कोटींच्या खंडणीखोरीचा अँगलही जोडला गेला. या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी सचिन वाझेच होता. मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग देखील या प्रकरणात वेगळ्या प्रकारे गोवले गेले.



सगळ्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे गेल्यानंतर एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे बाहेर आले. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे मुंबई पोलीसांना भाग पडले आहे. त्यातून त्याची मुंबई पोलीसांच्या सेवेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.

कोरोनाचे कारण देऊन सचिन वाझेला त्याच्या शिवसेना कनेक्शनमुळे २०२० मध्ये मुंबई पोलीसांच्या सेवेत परत घेण्यात आले होते. पण त्यानंतर अँटिलिया स्फोटकांपासून १०० कोटींच्या खंडणीखोरीची प्रकरणे बाहेर आली आणि त्यामध्ये सचिन वाझेच मुख्य आरोपी ठरल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याखेरीज मुंबई पोलीसांना पर्याय उरला नाही आणि त्यामुळेच त्याची पोलीस सेवेतून हकालपट्टी करावी लागली.

अर्थात या सगळ्या प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यासारखा राजकीय बळी गेल्यानंतर सचिन वाझेला कोणी वाचवायला पुढे येण्याची शक्यता कमीच होती. कारण यामध्ये शिवसेना – राष्ट्रवादीतील संबंधांच्या तणावाची भर पडली होती. सचिन वाझेने तोंड उघडू नये, यासाठी देखील बरेच प्रयत्न झाले. पण ते सगळे यशस्वी ठरलेले दिसत नाहीत. कारण राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजकीय बळीनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचा बळी जाणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन वाझेच्या पोलीस सेवेतील हकालपट्टीला राजकीय देखील महत्त्व आहे.

sachin waze dismissed imminant political decision

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात