अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य

भारतातील कोरोना बळींबाबत संपूर्ण जगात चर्चा होत असताना अमेरिकेने कोरोनाबळींची संख्या लपविल्याचे अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ँथनी फाऊची यांनीच मान्य केले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे किमान नऊ लाख लोकांचे मृत्यू झाले असावेत असे त्यांनी म्हटले आहे.Corona death toll rises to nine million, US chief medical adviser admits


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : भारतातील कोरोना बळींबाबत संपूर्ण जगात चर्चा होत असताना अमेरिकेने कोरोनाबळींची संख्या लपविल्याचे अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ँथनी फाऊची यांनीच मान्य केले आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे किमान नऊ लाख लोकांचे मृत्यू झाले असावेत असे त्यांनी म्हटले आहे.अमेरिकचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅँड इनफेक्शिअस डिसीजचे महासंचालक आहेत.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या विश्लेषणानुसार अमेरिकेतील बळींची संख्या नऊ लाख असावी असे म्हटले आहे. गणिती मॉडेल अनेकदा बरोबर असतात, असे डॉ. फाऊची यांनी मान्य केले आहे.

बळींची संख्या अमेरिकेने कमी सांगितली आहे हे खरेच आहे,असे सांगून डॉ. फाऊची म्हणाले, अमेरिकेत ५ लाख ८१ हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, यापेक्षा कितीतरी अधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना बळींची संख्या लपविण्यात आली आहे.

अमेरिकेतही लसीकरण मोहीम थंडावली आहे हे मान्य करून डॉ. फाऊची म्हणाले,काही समाजघटकांत लस घेण्याबाबत विरोध आहे. तरीही देशातील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

पिन्स हॅरी, जेनीफर लोपेझपासून ते अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनयांनी टीव्हीवर लसीकरणाचे आवाहन केल्यावर डॉ. फाऊची बोलत होते.

Corona death toll rises to nine million, US chief medical adviser admits

महत्त्वाच्या बातम्या