नेपाळच्या ‘लाल’ पंतप्रधानांना जोरदार झटका, चीनलाही फटका


चीनच्या ताटाखालचे मांजर बनून भारतविरोधी वक्तव्ये आणि कृती करणाऱ्या नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना सोमवारी जोरदार झटका बसला. नेपाळमध्ये पाय रोवून भारताला त्रास देण्याच्या चीनचे मनसुबेदेखील यामुळे उधळले गेले आहेत. चीनधार्जिण्या ओली यांचे पंतप्रधानपद गेल्याने नेपाळी घटनेनुसार आता तिथे नवे सरकार अस्तित्त्वात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने पडद्यामागून केलेल्या रणनितीला आलेले हे यश मानले जात आहे. Strong blow to Nepal’s ‘Red’ PM, Hit China too


वृत्तसंस्था

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना सोमवारी (दि. 10) प्रतिनिधी सभागृहात विश्वासाचे मत गमवावे लागले. पुष्पकमल दहल यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन (माओवादी सेंटर)ने पाठींबा काढून घेतल्यानंतर सत्तेवरची पकड आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधानांना नवा झटका बसला. त्यामुळे ओली यांना पदावरुन पायऊतार व्हावे लागणार आहे.

राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ओली यांना खालच्या सदनात फक्त 93 मते मिळवता आली. एकूण 275 सदस्यांच्या या सदनात ओली यांनी किमान 136 मते मिळवणे आवश्यक होते.या अपयशामुळे नेपाळी पंतप्रधान ओली यांनी विश्वासदर्शक ठराव गमवावा लागला. या विशेष अधिवेशनासाठी 232 खासदार उपस्थित होते.



“लोकप्रतिनिधी सभागृहाचे बहुमत मिळवण्याकरिता या प्रस्तावाच्या बाजूने दिलेली मते कमी पडल्याने मी याद्वारे जाहीर करतो की पंतप्रधानांचा विश्वासदर्शक मत मागण्याचा प्रस्ताव फेटाळला गेला आहे,”

असे सभागृह स्थगीत करण्यापूर्वी जाहीर करण्यात आले. नेपाळी राज्यघटनेतल्या कलम 100 (3) नुसार यामुळे आपोआपच ओली यांचे पंतप्रधानपद गेले आहे.

नेपाळमधील मुख्य विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेस आणि नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टी (माओवादी सेंटर) यांनी ओली यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले.

जनता समाजवादी पक्षाच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याचे स्पष्ट झाले. महेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील गट तटस्थ राहिला तर उपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील गटाने ओली यांच्या विरोधात मतदान केले.

प्रचंड यांच्या नेतृत्त्वातील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी केंद्राने गेल्या आठवड्यात पाठिंबा काढून घेतल्यानंतर ओली यांचे सरकार अल्पमतात आले होते.

विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर ओली आपोआपच पदच्यूत झाले. आता घटनात्मक प्रक्रियेनुसार नवीन युती सरकार स्थापन केले जाणार आहे. सीपीएन-माओवादीचे ज्येष्ठ नेते गणेश शहा म्हणाले की, श्री ओली यांनी तातडीने या पदाचा राजीनामा द्यावा आणि पर्यायी सरकार स्थापनेसाठी मार्ग प्रशस्त करावा.

दरम्यान, नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देउबा, सीपीएन-माओवादी केंद्राचे अध्यक्ष पुष्पकमल दहाल “प्रचंड” आणि जनता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र यादव यांनी संयुक्त निवेदन जारी करून नेपाळचे राष्ट्रपती भंडारी यांना पर्यायी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले.

नेपाळी राज्यघटनेनुसार नवीन पंतप्रधानांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे धरला आहे. सभागृहातील दोन किंवा अधिक पक्षांच्या मदतीने युती सरकार स्थापन करण्याची तरतूद घटनेत आहे.

कुमार वयात असतानाच विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून के. पी. शर्मा ओली नेपाळच्या राजकारणात कार्यरत झाले. नेपाळी राजेशाहीला विरोध म्हणून त्यांनी चौदा वर्षे तुरुंगात काढली. डाव्या आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून ओली यांनी दोनदा नेपाळचे पंतप्रधानपद भूषवले.

चीनधार्जिण्या धोरणांमुळे ओली यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला होता. ओली हे चीनच्या तालावर नाचू लागल्याने त्यांच्या कारकिर्दीत नेपाळचे भारताशी असणारे दीर्घकाळचे मैत्रीसंबंध ताणले गेले होते.

ओली यांना विविध आमिषे दाखवून चीनने वश केल्याचा आरोप नेपाळी जनता करत होती. त्यांच्या भारतविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेमधूनही ओली यांच्याबद्दल असंतोष होता.

ओली यांच्या पराभवामुळे चीनलाही जोरदार धक्का बसला आहे. ओली यांच्या माध्यमातून नेपाळवर अंकूश ठेवत भारताला त्रास देण्याची त्यांची रणनिती होती. भारतविरोधी कारवायांसाठी चीनला नेपाळचा वापर करायचा होता.

Strong blow to Nepal’s ‘Red’ PM, Hit China too

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात