नेपाळमध्ये राजकीय संकट गडद, पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी गमावले विश्वास मत

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote In Parliament

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा संसदेतील बहुमत चाचणीत पराभव झाला आहे. नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ओली यांना 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी 136 मतांची गरज होती. Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote In Parliament


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा संसदेतील बहुमत चाचणीत पराभव झाला आहे. नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ओली यांना 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी 136 मतांची गरज होती. कनिष्ठ सभागृहात एकूण 232 मते पडली. ओलींच्या बाजूने 93 खासदारांनी मतदान केले. त्याचवेळी त्यांच्या विरोधात 124 खासदारांनी मतदान केले. 15 खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही.

प्रतिनिधी सभागृहाच्या आजच्या विशेष अधिवेशनात ओली यांनी औपचारिकपणे विश्वासदर्शक ठराव मांडला आणि सर्व सदस्यांना त्यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान, पुष्पकमल दहल उपाख्य ‘प्रचंड’ यांच्या नेपाळी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर ओली सरकार अल्पमतात आले होते. यानंतर त्यांना कनिष्ठ सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार होते.

नेपाळमधील राजकीय पेचप्रसंग गेल्या वर्षी 20 डिसेंबरपासून सुरू झाला होता. तेव्हा राष्ट्रपती भंडारी यांनी पंतप्रधान ओलींच्या सूचनेवरून संसद बरखास्त केली होती व 30 एप्रिल आणि 10 मे रोजी नव्याने निवडणुकांचे आदेश दिले होते. ओलींची ही सूचना नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये सत्तेबाबत सध्या सुरू असलेल्या कुरघोडीमुळे करण्यात आली होती.

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote In Parliament

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात