बंगालमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी, निवडणुकीत ममता बॅनजींचा केला होता पराभव

bengal bjp announces suvendu adhikari will be leader of opposition at the west bengal legislative assembly

suvendu adhikari  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बनर्जींचा (Mamata Banerjee) पराभव करणारे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची भाजपने विधानसभा गटनेतेपदी निवड केली आहे. bengal bjp announces suvendu adhikari will be leader of opposition at the west bengal legislative assembly


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बनर्जींचा (Mamata Banerjee) पराभव करणारे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची भाजपने विधानसभा गटनेतेपदी निवड केली आहे. सुवेंदु अधिकारी आता विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळतील. यापूर्वी या पदासाठी सुवेंदु अधिकारी यांच्याशिवाय बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदुंनी (Suvendu Adhikari) तृणमूल प्रमुख मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांना पराभवाची धूळ चारली होती. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आकडेवारीनुसार, नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदु अधिकारी यांनी ममता बनर्जी यांचा 1956 मतांच्या फरकाने पराभव केला होता. निवडणुकीत सुवेंदु अधिकारी यांना एकूण 109673 मते मिळाली होती. तर ममता बनर्जी यांना 107937 मते मिळाली होती.

भाजपने 77 जागा जिंकल्या

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांपैकी 292 मतदारसंघांमध्ये 8 टप्प्यांत मतदान झाले होते. 2 मे रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 77 जागांवर विजय मिळवला होता. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त 3 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने 213 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले. तर डावे आणि इतरांना 1-1 जागा मिळाली. दोन जागांवरील उमेदवारांच्या मृत्यूमुळे निवडणुका झाल्या नाहीत. त्या जागांवर 16 मे रोजी मतदान होईल.

bengal bjp announces suvendu adhikari will be leader of opposition at the west bengal legislative assembly

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात