काँग्रेसचे CWC बैठकीत पराभवावर आत्ममंथन, सोनिया गांधींकडून पक्षात मोठ्या बदलांचे संकेत

Sonia Gandhi Lashes Out At Leaders In CWC Meeting, Said, Reforms in party are Must

CWC Meeting :  कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या निकृष्ट कामगिरीनंतर मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, या निवडणुकांचे निकाल हे स्पष्ट करतात की कॉंग्रेसमध्ये अनेक गोष्टी सुधाराव्या लागतील. विशेष म्हणजे आसाम आणि केरळमध्ये सत्तेत परत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॉंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. Sonia Gandhi Lashes Out At Leaders In CWC Meeting, Said, Reforms in party are Must


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या निकृष्ट कामगिरीनंतर मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या की, या निवडणुकांचे निकाल हे स्पष्ट करतात की कॉंग्रेसमध्ये अनेक गोष्टी सुधाराव्या लागतील. विशेष म्हणजे आसाम आणि केरळमध्ये सत्तेत परत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॉंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कॉंग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, “आपल्याला या गंभीर धक्क्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या निकालांमुळे मोठी निराशा आली आहे. त्या म्हणाल्या की, या निवडणुकीच्या कारणांवर विचार करण्यासाठी एक छोटा गट तयार करावा, तसेच या गटाने याचा लवकरात लवकर अहवाल द्यावा.”

बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, केरळ आणि आसाममधील सध्याची सरकारे हटवण्यात आम्हाला का अपयश आले, बंगालमध्ये आपले खाते का उघडले नाही, यावर विचार होणे गरजेचे आहे. सोनिया पुढे म्हणाल्या, “22 जानेवारीला आपली बैठक झाली तेव्हा आपण कॉंग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक जूनच्या मध्यापर्यंत होईल, असा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. वेणुगोपाल हे कोविड-19 आणि निवडणुकीच्या निकालांवरील चर्चेनंतर याचे वाचन करतील.

सोनिया गांधी सभेत म्हणाल्या, की कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अशा नाजूक वेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. कोरोनाला एक मोठं आरोग्य संकट म्हणून संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांना लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.

सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी निर्णय घेतला आहे. आसाम आणि केरळमधील पराभव तसंच पश्चिम बंगालमध्ये पक्षाला मिळालेल्या शून्य जागा अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. जूनअखेरीस होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबाबतची माहितीही त्यांनी दिली. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासह सीडब्ल्यूसीचे इतर सदस्य या बैठकीला हजर होते.

Sonia Gandhi Lashes Out At Leaders In CWC Meeting, Said, Reforms in party are Must

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात