Himanta Biswa Sarma takes oath as the Chief Minister of Assam

हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, नड्डांसमवेत हे नेते होते हजर

Himanta Biswa Sarma : भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी दुपारी 12 वाजता श्रीमंता संकरदेव कलाक्षेत्र येथे राज्यपाल जगदीश मुखी यांनी हेमंत बिस्वा सर्मा यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री सरमा यांच्याव्यतिरिक्त इतर मंत्र्यांचाही शपथविधी यावेळी झाला. शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. Himanta Biswa Sarma takes oath as the Chief Minister of Assam


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी दुपारी 12 वाजता श्रीमंता संकरदेव कलाक्षेत्र येथे राज्यपाल जगदीश मुखी यांनी हेमंत बिस्वा सर्मा यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री सरमा यांच्याव्यतिरिक्त इतर मंत्र्यांचाही शपथविधी यावेळी झाला. शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, मणिपूरचे सीएम बिरेन सिंघ, नागालँडचे सीएम नेईफिऊ रियो आदी उपस्थित होते.

नव्या मुख्यमंत्र्यांपुढे कोरोनाचे आव्हान

आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर हेमंत सरमा यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान कोरोनाचे असेल. राज्यात कोरोना संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे. यामुळे मुख्यमंत्री सरमा यांना यावर नियंत्रण ठेवावे लागेल. हेमंत बिस्वा सरमा एक अभ्यासू राजकारणी आहेत, सरमांची पकड राज्यापासून दिल्लीपर्यंत आहे. तरुण गोगोई यांच्याशी मतभेदानंतर हेमंत बिस्वा सरमा यांनी 2015 मध्ये कॉंग्रेस सोडली होती.

शपथेआधी कामाख्या मंदिरात पूजा

शपथ घेण्यापूर्वी हेमंत बिस्वा सरमा यांनी देवी भगवतीचा आशीर्वाद घेतला. कामाख्या मंदिर आणि डोल गोविंद मंदिरात सरमा यांनी प्रार्थना केली. यापूर्वी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सरमा यांचे नाव पुढे केले, त्यास सर्व आमदारांनी सहमती दर्शविली. त्यानंतर सरमा यांनी रविवारी राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता.

आसामात एनडीएच्या 75 जागा

आसामच्या 126 सदस्यांच्या विधानसभेत एनडीएला 75 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 60, तर सहकारी पक्ष आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) यांना अनुक्रमे नऊ व सहा जागा मिळाल्या आहेत.

Himanta Biswa Sarma takes oath as the Chief Minister of Assam

महत्त्वाच्या बातम्या