फेसबुकवर भाजप नेत्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या 54 जणांवर पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Cyber police registered a case against 54 people for making offensive remarks against BJP leaders

Pune Cyber police : सोशल मीडियावर राजकारण्यांवर टीका करणे एकवेळ ठीक आहे, परंतु त्यांचे फोटो अश्लील पद्धतीने एडीट करून आक्षेपार्ह कॉमेंट टाकणे महागात पडू शकते. पुणे सायबर पोलिसांत याच मुद्द्यावरून 54 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे अॅड. प्रदीप गावडे यांनी याबाबत पुराव्यानिशी तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी 54 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Pune Cyber police registered a case against 54 people for making offensive remarks against BJP leaders


विशेष प्रतिनिधी

पुणे : सोशल मीडियावर राजकारण्यांवर टीका करणे एकवेळ ठीक आहे, परंतु त्यांचे फोटो अश्लील पद्धतीने एडीट करून आक्षेपार्ह कॉमेंट टाकणे महागात पडू शकते. पुणे सायबर पोलिसांत याच मुद्द्यावरून 54 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे अॅड. प्रदीप गावडे यांनी याबाबत पुराव्यानिशी तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी 54 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अॅड. प्रदीप गावडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भाजप नेत्यांवर अश्लील टीका-टिप्पणी करणाऱ्या राष्ट्रवादी व सेनेशी संबंधित 54 व्यक्तींवर पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, कायदा सर्वांसाठी एक आहे. जर कोणाला वाटत असेल की सत्तेत असल्यामुळे त्यांचा कायदा चालेल, तर अशा लोकांनी लवकर या गैरसमजातून बाहेर यावे.

अॅड. गावडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, मागच्या अनेक दिवसांपासून फेसबुक या समाज माध्यमावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच इतर भाजप नेते, सन्माननीय व्यक्ती, हिंदू संत यांच्यावर काही असामाजिक तत्त्वांकडून वारंवार अत्यंत अश्लील, खालच्या दर्जाच्या अवमानकारक तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट किंवा कॉमेंट केल्या जात आहेत. काही पोस्ट, कॉमेंटवर महिलांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या आहेत. काही पोस्टमधून धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या पोस्ट्स तसेच कॉमेंट्स एक कोटी अजित पवार व सुप्रिया सुळे समर्थक व कार्य शिवसेनेचे या फेसबुक ग्रुपमध्ये करण्यात आल्या आहेत, तर काही वैयक्तिक प्रोफाइलवरून करण्यात आल्या आहेत. या सर्व पोस्टचे स्क्रीनशॉट सोबत जोडले आहेत. या सर्व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी अॅड. प्रदीप गावडे यांनी केली.

त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी व शिवसेनेशी संबंधित तब्बल 54 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अॅड. प्रदीप गावडे यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या विषयावर संबंधितांशी बोललो असल्याचे ट्वीट केले. यावरही अॅड. गावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गावडे यांनी आव्हाड त्यांचे खाते नसतानाही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप कसा करू शकतात? असा सवालही उपस्थित केला आहे.

Pune Cyber police registered a case against 54 people for making offensive remarks against BJP leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात