तब्बल १८ राज्यांना कोवॅक्सिन लसीचा थेट पुरवठा ; भारत बायोटेककडून लसीकरण मोहिमेला चालना


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची पहिली स्वदेशी कोरोनाविरोधी लस निर्माण करण्याचा मान भारत बायोटेक कंपनीला मिळाला आहे. तब्बल 18 राज्यांना भारत बायोटेककडून कोवॅक्सिन लसीचा थेट पुरवठा केला जात आहे. COVAXIN® has been directly supplied to 18 states since May 1st.

भारत बायोटेकने देशातील विविध राज्यांमध्ये 1 मे पासून लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा तेव्हापासून आजपर्यंत निरंतर सुरु आहे.


Covaxin Vaccine : अल्पवयीन मुलांना कोवॅक्सिन लसीचे डोस ;तज्ज्ञ समितीकडून चाचणीसाठी शिफारस


भारत बायोटेक कंपनीने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, आसम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

कोवॅक्सिन डबल म्यूटेंटवर प्रभावी

दरम्यान, कोवॅक्सिन डबल म्यूटेंटवर प्रभावी असल्याचे संशोधनात सुस्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करताना आयसीएमआर आणि भारत बायोटेकने म्हटलं होतं ती, सामान्य कोरोनाबाधित रुग्णांवर कोवॅक्सिन ही लस 78 टक्के प्रभावी आहे. त्याशिवाय कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटेंटविरोधातही प्रभावी आहे. डबल म्यूटेंटविरोधातही अँटीबॉडी बनवण्याचं काम कोवॅक्सिन ही लस करते, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलं होतं.

COVAXIN® has been directly supplied to 18 states since May 1st.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात