पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झालाच नाही. उलट या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तानाजी पवार या कंत्राटदाराच्या मॅनेजरला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली. बनसोडेंनी त्याला मंगळवारी चांगलेच धमकावले असल्याचेही मोबाईल संभाषणावरून उघड झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झालाच नाही. उलट या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तानाजी पवार या कंत्राटदाराच्या मॅनेजरला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केली. बनसोडेंनी त्याला मंगळवारी चांगलेच धमकावले असल्याचेही मोबाईल संभाषणावरून उघड झाले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी लागल्याचं निशाण अद्याप सापडलेले नाहीत. तानाजी पवार यांचा जबाब आणि पोलिसांना गोळीच्या खुणाही सापडल्या नसल्याने आमदारांचा गोळीबाराचा दावा खोटा असल्याचे बोलले जात आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांची तानाजी पवार यांच्याशी मंगळवारी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये बनसोडे हे तानाजी पवारला धमकावत आहेत. आमदारांनी केलेले संभाषणही पुढे आले आहे. त्यांच्या तील संवाद पुढीलप्रमाणे
आमदार : जहागीरदार तुला बोलावलेलं कळत नाही का? एवढे फोन केले उचलत नाहीस, कमीतकमी येऊन तर जा ना?
तानाजी पवार : मी काल फोन केला होता, तुम्ही फोन उचलला नाही. आपण योग्य भाषा वापरा, जहागीरदार वगैरे म्हणण्याची भाषा योग्य नाही. तुम्ही आमदार साहेब अहात म्हणजे आम्ही काहीही ऐकून घ्यायचं का?
आमदार – ( शिवीगाळ करायला सुरुवात केली.) एक काम कर तू कुठं आहे सांग मी तिथं येतो.
तानाजी पवार : साहेब मी मुंबईत आहे. पण आपण शिवीगाळ करायची गरज नाही. तुमचं काम काय अडलंय हे सांगा.
आमदार : तुझा मालक आजूबाजूला आहे का
तानाजी पवार : यात मालकाचा काय संबंध आहे, मी मुंबईत माज्या कामासाठी आलोय.
आमदार : नाही नाही सांगतो ना तुझ्या मालकाला. घे रे तो मोबाईल
तानाजी पवार : बोला, बोला तुम्ही माझ्या मालकाशी बोला. काही अडचण नाही. ही तुमची भाषा ना एका जनप्रतिनिधीला शोभत नाही. आम्ही तुमच्याशी इज्जतीने बोलतोय आणि तुम्ही शिव्या देताय.
आमदार : (पुन्हा शिवीगाळ)
तानाजी पवार : आपण काय बोलताय हे आपल्याला तरी कळतंय का?
आमदार : तू काय बोलतो हे तुला कळतं का?
तानाजी पवार : मी काय बोलतोय तेंव्हा
आमदार : तू मालक नाही, कामगार आहे.
तानाजी पवार : मी कुठं म्हणतोय मालक आहे. तुम्ही शिव्या कशा देताय.
आमदार : बरं तू ये उद्या.
तानाजी पवार : येतो मी उद्या.
या संभाषणानंतर तानाजी पवार आमदारांना भेटायला त्यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर तेथेही वादावादी झाली. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला मारहाण करत, कार्यालयाबाहेर आणलं. यावेळी पवारने त्याच्याकडे असणाºया बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या माझ्या दिशेने झाडल्याचा दावा आमदारांनी केला.
अटकेत असलेल्या तानाजी पवारांनी आमदारांचे कार्यकर्ते मला बेदम मारहाण करत होते. माझा जीव जाण्याची शक्यता होती, म्हणून बचावासाठी मी हवेत गोळीबार केल्याचे तानाजी पवारने जबाबात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App