शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील 69000 सहाय्यक शिक्षकांनी सरकारच्या रिक्रुटमेंट धोरणांविरुध्द आवाज उठवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने कॅडल मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराकडे जात असताना, पोलिसांनी या शिक्षकांवर लाठीचार्ज केला आहे. ही घटना शुक्रवारी लखनौ येथे घडली.

Police lathi charge on 69000 assistant teachers front

सरकारी शाळांमध्ये सहायक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारच्या काही नोकरी विषयक धोरणांविषयी प्रॉब्लेम्स होते. म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला होता. या लाठी चार्ज दरम्यान बरेचसे शिक्षक जखमी झालेले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांनी या घटनेची टीका केलेली आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलरचा वापर करत लिहिले आहे की, एकीकडे उत्तर प्रदेश ‘विश्व गुरू’ बनण्याच्या मार्गावर आहे, तिथे शिक्षकांवर लाठीहल्ला होणे हे कितपत योग्य आहे ल. आम्ही 69000 शिक्षकांच्या भरतीच्या मागणीच्या बरोबर आहोत. आज कालचे युवा म्हणतात की, आम्हाला भाजप नको. #भाजपखतम असे त्यांनी ट्विट केले आहे.


आंदोलकांवरील लाठीचार्जचा राकेश टिकैत यांनी केला निषेध, म्हणाले- देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा


तर उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस अध्यक्ष अजय कुमार लालू यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील बॅकवर्ड वर्गातील आणि दलित लोकांच्या मुलांवर केलेला हा हल्ला आहे.

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विटरचा आधार घेत या घटनेची टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, जे लोक रोजगार मागण्यासाठी जात आहेत, त्यांच्यावर लाठीहल्ला केला जातो. जेव्हा भाजप मते मागण्यासाठी येईल त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवा.

प्रियांका गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात की, रोजगार मागण्यासाठी हातात मेणबत्ती घेऊन मागणी करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करणे हे चुकीचे. तरुणांनो तुमच्यावर कितीही लाठीचार्ज होऊ द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई तुम्ही थांबवू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे.

Police lathi charge on 69000 assistant teachers front

 

महत्त्वाच्या बातम्या