पुणे : ओमायक्रॉनच्या एन्ट्रीमुळे महापालिका खडबडून जागी , राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले


‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. Pune: State Government and Municipal Corporation set up a Jumbo Covid Hospital with a capacity of 800 seats


विशेष प्रतिनिधी

पुणे : जगातील १२ देशांमध्ये वाढलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. पुण्यात देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता परंतु त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान झपाट्याने संसर्गित होणाऱ्या करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली आहे.

‘ओमायक्रॉन’चे रुग्ण सापडण्याआधीच पुणे पालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आवारातील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली.



महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती आणि अन्य विभाग प्रमुखांनी ही भेट दिली.दरम्यान या रुग्णालयातील सर्व साहित्य आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन ‘रेडी पोझिशन’ मध्ये ठेवण्याच्या संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्य सरकार आणि महापालिकेने ८०० आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले. या रुग्णालयात यावर्षी जुलैपर्यंत साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

Pune : State Government and Municipal Corporation set up a Jumbo Covid Hospital with a capacity of 800 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात