सावरकर कोण होते?; शशी थरूर, राजदीप यांना चरित्रकार विक्रम संपत यांनी दिले चोख प्रत्युत्तर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाचा विषय निघाला, त्यावेळी इतिहासकार विक्रम संपत यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि निवेदक राजदीप सरदेसाई यांना चोख प्रत्युत्तर दिले. सावरकर नेमके कोण होते? क्रांतिकारक?, हिंदुत्ववादी नेते? की मुस्लिम विरोधी नेते?, असा खोचक सवाल राजदीप सरदेसाई यांनी केला होता.त्याला प्रत्युत्तर देताना विक्रम संपत यांनी परखड शब्दांमध्ये सावरकर या तीनही पैलूंचे मिश्रण होते, असे स्पष्ट केले. Who was Savarkar ?; Character Vikram Sampat gave a good reply to Shashi Tharoor and Rajdeep

सावरकर आयुष्यभर क्रांतिकारक राहिले. देशातल्या सर्व क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध आला. भगतसिंग, दुर्गा भाभी, रास बिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधांमुळे रत्नागिरीत त्यांची स्थानबद्धता पाच वर्षांवरून तेरा वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. ज्यांच्या पदव्या ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिश सरकार पेन्शन देत होते. त्यातील सर्वात तुटपुंजी पेन्शन म्हणजे फक्त 60 रुपये सावरकरांना मिळत होते, याची आठवण विक्रम संपत यांनी शशी थरुर यांना करून दिली.

संसदेत महात्मा गांधींच्या समोर सावरकरांचे तैलचित्र का असावे?, असा सवाल शशी थरूर यांनी केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना सावरकरांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाचा तपशीलवार उल्लेख विक्रम संपत यांनी केला. देशात फक्त स्वातंत्र्यलढ्याचा एकच नॅरेटिव्ह आत्तापर्यंतचा सांगण्यात आला. अनेक हुतात्म्यांना क्रांतिकारकांना पडद्याआड ढकलण्यात आले. आता ही वेळ आली आहे की अनेक स्वातंत्र्य सैनिकांना त्यांचे श्रेय दिले गेले पाहिजे. इतिहासातले त्यांचे स्थान अधोरेखित केले गेले पाहिजे, याकडे विक्रम संपत यांनी लक्ष वेधले.



देश फक्त अहिंसेने स्वतंत्र झालेला नाही तर सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रयत्न देखील तितकेच स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरले याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्या पुराव्यांसह नवा इतिहासही लिहिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन विक्रम संपत यांनी केले.

देशात 14 ऑगस्ट हा फाळणी अत्याचार स्मरण दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, याविषयी शशी थरूर यांनी चिंता व्यक्त केली. त्याला प्रत्युत्तर देताना विक्रम संपत यांनी इजरायल, जर्मनी, अमेरिकेतल्या होलोकॉस्ट म्युझियमचा उल्लेख केला. तिथल्या होलोकॉस्ट म्युझियम मुळे जनतेला दुसऱ्या महायुद्ध काळात झालेल्या अत्याचारांची संपूर्ण कल्पना येते. भविष्यात त्या पद्धतीचे आत्याचार घडू नयेत यासाठी ती आठवण जागविली जाते. भारतात देखील फाळणी हे वास्तव असेल तर त्यावेळच्या आठवणी जागवण्यात काहीही गैर नाही. त्या पद्धतीचे अत्याचार इथून पुढच्या काळात होऊ नयेत हे सध्याच्या पिढीच्या मनावर ठसवले पाहिजे, असे उत्तर विक्रम संपत यांनी दिले.

Who was Savarkar ?; Character Vikram Sampat gave a good reply to Shashi Tharoor and Rajdeep

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात