उत्तर प्रदेश निवडणूक लवकरच मायावतींभोवती फिरेल; २००७ चा चमत्कार परत घडेल; सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी फक्त भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जणू काही ही निवडणूक फक्त या दोन पक्षांमध्ये होत आहे, असे ते दाखवत आहेत. परंतु लवकरच उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या भोवती फिरायला लागेल, असा दावा बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीश चन्द्र मिश्रा यांनी केला आहे. U P elections will not be by poler, it will revolve around Mayawati soon

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल आणि समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर असेल असे दावे विविध प्रसारमाध्यमांनी जनमत चाचणीच्या आधारे केले आहेत. या पार्श्वभूमीवर सतीशचंद्र मिश्रा यांनी निवडणूक लवकरच मायावती यांच्या भोवती फिरणार असल्याचा दावा केला आहे. त्याच बरोबर 2007 मध्ये मायावती पूर्ण बहुमत घेऊन उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्या होत्या तसाच चमत्कार 2022 च्या निवडणुकीत घडेल. मायावती पूर्ण बहुमताने सत्तेवर येतील आणि प्रसारमाध्यमांना चमकावतील, असा दावाही मिश्रा यांनी केला आहे.



उत्तर प्रदेश मध्ये प्रियंका गांधी, योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव हे तिघेही विविध कार्यक्रमांद्वारे जनतेसमोर सातत्याने येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाले आहेत आणि होणारही आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर मायावती मात्र राजकीय दृष्ट्या काहीशा मंदावलेल्या दिसत आहेत. आज त्यांनी घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रात आणि राज्यात राज्यघटना विरोधी सरकार आहे. रोज दीनदलित दुबळ्या व्यक्तींवर अत्याचार होत आहेत. परंतु ही परिस्थिती उत्तरप्रदेशात लवकरच बदलेल, असे वक्तव्य मायावती यांनी केले आहे.

मायावती उत्तर प्रदेशच्या निवडणूक दौऱ्यावर निघाल्या की सगळी निवडणूक त्यांच्याभोवती फिरायला लागेल. आज बहुजन समाज पक्ष पोस्टर, बॅनरवर दिसत नसला तरी तो लोकांच्या हृदयात आहे. मायावतींच्या निवडणूक दौऱ्यामध्ये याचे प्रसारमाध्यमांना देखील प्रत्यंतर येईल, असे सतीशचंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे.

U P elections will not be by poler, it will revolve around Mayawati soon

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात