ई. डी. इफेक्ट : आनंदराव अडसुळांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा!!; शिंदे गटाच्या बळात वाढ??


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांमध्ये ई. डी. इफेक्ट तर दिसलाच पण त्या पलीकडे जात आता खासदार आणि माजी खासदारांवरही या ई. डी. चा इफेक्ट होताना दिसतो आहे. अर्थात हे ई. डी. म्हणजे एकनाथ – देवेंद्र की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडी हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे!!E. D. Effect : anandrao Adsul resigned as Shivsena leader

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे विधानसभेतील ४० आमदारांनी वेगळे होऊन त्यांनी परस्पर भाजपाशी सलगी करत राज्यात सत्ता स्थापन केली आहे, या धक्क्यातून सावरत नाही तोच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास सुचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.



अडचणीच्या काळात पक्ष पाठिशी नव्हता 

आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवून दिले आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात पक्ष नेतृत्वाकडून विचारपूसही करण्यात आली नाही, अशी खंतही आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान आनंदराव अडसूळ यांचा मुलाग अभिजीत अडसूळ हा आधीच एकनाथ शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

E. D. Effect : anandrao Adsul resigned as Shivsena leader

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात