राज्यभर चंद्रकांत पाटलांची जोरदार चर्चा ; पुण्यात भर पावसात ठोकलं भाषण


काल पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं करण्यात आलं. Chandrakant Patil’s vigorous discussion across the state; Speech in heavy rain in Pune


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची २०१९ मधील साताऱ्यातली प्रचारसभा अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आहे. कारण ही प्रचारसभा पवारांनी भर पावसात भिजत केली होती.या प्रचारसभेची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली होती.दरम्यान हेच चित्र काल पुण्यात पाहायला मिळालं.चंद्रकांत पाटील यांनी पावसात भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे या भाषणाची देखील चर्चा सुरू झाली आहे.चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काल पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं करण्यात आलं.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण झालं.यावेळी चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस कोसळू लागला, मात्र पाटील यांनी न थांबता आपलं संबोधन सुरूच ठेवलं.

या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.

Chandrakant Patil’s vigorous discussion across the state; Speech in heavy rain in Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात