PROUD STORY : सातारा जिल्ह्यातील गांजे गावातील लेकीची सैन्यात निवड; ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण; शिल्पा चिकणे यांचे भव्य स्वागत

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गांजे गावामधील शिल्पा चिकणे यांची सैन्यदलात निवड


त्या नुकत्याच आसाम रायफलचे ट्रेनिंग पूर्ण करून गावात परतल्या


विशेष प्रतिनिधी

सातारा : आज मुली यशाची उत्तुंग शिखर सर करून देशासह गावाचे नाव देखील उंचावत आहेत. अशाच एका सामान्य मुलीची ही असामान्य कामगिरी अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरणार आहे. जावळी तालुक्यातील गांजे गावामधील रहिवासी असेलेल्या शिल्पा चिकणे यांची सैन्यदलात निवड झाली आहे. सैन्यदलाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या गावातील पहिल्या महिला आहेत. गावात येताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. PROUD STORY: Selection of Leki from Ganje village in Satara district; Overflowing with the joy of the villagers; Grand welcome to Shilpa Chikane

त्या नुकत्याच आसाम रायफलचे ट्रेनिंग पूर्ण करून गावात परतल्या. सैन्यदलाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्या गावातील पहिल्या महिला आहेत. गावात येताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

शिल्पा चिकणे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय सैन्य दलात भरती होणारी शिल्प ही गावातील पहिलीच मुलगी आहे. त्यांची सैन्यदलात निवड झाल्याने गावाची मान उंचावली. आता गावातील इतर मुली देखील शिल्पा यांच्याकडून प्रेरणा घेतील, भविष्यात गावातील आणखी काही लेकी  सैन्य दलात दिसतील.अशा शब्दांत ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

जल्लोष

शिल्पा चिकणे या नुकत्याच आसाम रायफलचे प्रशिक्षण घेऊन गावी परतल्या आहेत. शिल्पा या आपल्या मूळ गावी येताच प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. गावच्या लेकीच्या स्वागताला संपूर्ण गाव एकवटला होता. शिल्पा यांचे गावात आगमन होताच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. देशभक्तीपर गीते लावून आणि शिल्पा यांच्यावर हार, पुष्पांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी मिरवणुकीच्या वेळी आपल्या दारांपुढे सुंदर अशा रागोळ्या देखील काढल्या होत्या. अवघे गाव भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

PROUD STORY :  Selection of Leki from Ganje village in Satara district; Overflowing with the joy of the villagers; Grand welcome to Shilpa Chikane

महत्त्वाच्या बातम्या