बुलडाणा : संपकऱ्यांनी धावत्या बसवर केली दगडफेक, बस झाडावर आदळली


काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.Buldana: Communicators hurled stones at a running bus and the bus collided with a tree


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे.तर काही कर्मचारी हे कामावर परतले आहे.

दरम्यान बुलडाण्यात एसटी बस सुरू झाल्या आहे.पण, काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.



एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. अशातच ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे.

अशातच बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराच्या एसटी बसवर आज जळगाव जामोदवरून शेगावकडे येत होती.दरम्यान बा येत असताना बस वर दगडफेक करण्यात आली. चालकाच्या दिशेने भिरकावलेल्या दगडामुळे चालकाने बचावाचा प्रयत्न की असताना केल्याने अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली.

या दगडफेकीत एसटी बसचे समोरील काच फुटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालकासह प्रवाशी जखमी झाले नाहीत.चालकाने वेळीच नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर एसटी प्रशासनाकडून या प्रकरणी तामगाव पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला आहे.

Buldana: Communicators hurled stones at a running bus and the bus collided with a tree

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात