रेल्वे भरती परीक्षेचा आज निकाल, दीड लाख पदांवरील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. दीड लाखांवर पदांवरील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला यातून होणार आहे.
रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने नॉन टेक्निकल ग्रुप सी पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती.Result of Railway Recruitment Examination today, decision of fate of candidates for 1.5 lakh posts

त्याचा निकाल शनिवारी लागणार आहे. या पदांवरील परीक्षा चार टप्यांत घेण्यात आल्या होत्या. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार निकाल अंतिम करण्याचे काम सुरू आहे. देशातील वेगवेगळ्या रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर संबंधित विभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.त्यासाठीची लिंक शनिवारी कार्यान्वित केली जाणार आहे. उमेदवारांनी निकालाची प्रिंट काढून घेतल्यावर सॉफ्ट कॉपी सेव्ह करावी, असे आवाहन रेल्वे भरती बोर्डाने केले आहे.

या निकालांच्या तारखांबरोबरच या परीक्षेचा पुढचा टप्पा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ट टेस्टच्या आयोजनाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या टेस्ट 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

Result of Railway Recruitment Examination today, decision of fate of candidates for 1.5 lakh posts

महत्त्वाच्या बातम्या