राहूल गांधींच्या ट्विटचा हवाला देऊन पाकिस्तानकडून भारताची बदनामी, द वायरच्या मुलाखतींचा संदर्भ देऊन कोरोनाच्या मृत्यू संख्येवर केले होते प्रश्नचिन्ह

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदीद्वेषातून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी भारताची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अमेरिकेतील भारतीय डॉक्टरची द वायर या आणखी एका मोदीद्वेष्टया न्यूजपोर्टलवरील मुलाखतीचा काही भाग ट्विट करून राहूल गांधी यांनी भारताच्या कोरोनाच्या मृत्यूच्या आकड्यांवर संशय व्यक्त केला होता. पाकिस्तानच्या सरकारी पीटीव्ही या वृत्तवाहिनीने हेच ट्विट केले आहे.Corona’s death was questioned, citing Rahul Gandhi’s tweet Pakistan’s defamed India, citing interviews with The Wire.

पीटीव्ही राहूल गांधी यांचे ट्विट शेअर करत म्हटले आहे की भारताचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे एका तज्ज्ञाच्या व्हिडीओ शेअर करत म्हणत आहेत की भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. मात्र, सरकार हे आकडे लपवित आहे.राहूल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर द वायर या न्यूजपोर्टलवर करण थापर यांनी डॉ. प्रभात झा यांची घेतलेली मुलाखत शेअर केली आहे. या ट्विटला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, भारत सरकार खोटे बोलत आहे. जगाला माहीत आहे की भारताला त्रास सहन करावा लागतो.

डॉ. झा हे कॅनडाच्या टोरंटो येथील सेंट मायकल हॉस्पिटलमधील सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चचे संस्थापक संचालक आहे. त्यांनी या मुलाखतीत भारताच्या कोविड हाताळणीवर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटना भारतातील कोरोनाच्या मृत्यूच्या संख्येवर विश्वास ठेवत नाही.

याचे कारण म्हणजे भारताने ही संख्या लपविली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूची संख्या खूप जास्त आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना डॉ. झा यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला डॉ. झा यांनी दिला असला तरी याच संघटनेने २०२० मध्ये म्हटले होते की कोरोना माणसातून माणसाला संक्रमित होत नाही.डॉ. झा यांचे तथ्यहिन वक्तव्य राहूल गांधी यांनी ट्विट केले आहे.

मात्र, कोरोना परिस्थितीच्या हाताळणीवरून राहूल गांधी यांनी भारताची बदनामी करण्याची पहिली पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी राजकारण करत अनेकदा मोदी सरकार विरुध्द वातावरण तयार करायचे म्हणून चुकीची माहिती दिली होती.

भारताला बदनाम करण्याच्या कॉँग्रेसच्या प्रचाराचा पाकिस्तानने नेहमीच पुरस्कार केला आहे. पाकिस्तानकडून कॉंग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये नेहमीच जगासमोर नेली जातात. नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधातील आंदोलनाच्या वेळीही राहूल गांधी यांची वक्तव्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उचलून धरली होती. दिल्लीतील दंगली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडविल्याचा आरोप केला होता.

Corona’s death was questioned, citing Rahul Gandhi’s tweet Pakistan’s defamed India, citing interviews with The Wire.

महत्त्वाच्या बातम्या