कोस्टल रोडच्या कामात आताच 1600 कोटींच्या कामाचा तवंग, भाजपाचे आमदार आशिष शेलार यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणाºया कोस्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्सल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.BJP MLA Ashish Shelar alleges Rs 1,600 crore work on Coastal Road

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे.शेलार म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या.



त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईच्या गल्लीतील रस्त्यांचे डांबरिकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची आहे. प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दजार्चे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. हे काय तुम्ही करून दाखवताय? असा सवाल करून शेलार म्हणाले,

अशीच कार्यपध्दती राहिली तर मुंबईकरांच्या 14 हजार कोटी गेले वाहून, असे होईल की काय अशी भीती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच भाजपची भूमिका आहे. हा विषय शिवसेनेने प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणाऱ्या चुका आम्ही दाखवून देत आहोत. त्या चुका त्या वेळीच सुधाराव्या.

BJP MLA Ashish Shelar alleges Rs 1,600 crore work on Coastal Road

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात